Ticker

6/recent/ticker-posts

गेवराई येथे तिरंगा रॅली संपन्न!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
बीड :  गेवराई येथे देशातील सीमेवर लढणाऱ्या वीर जवानांप्रति आदर व्यक्त करण्यासाठी तिरंगा रॅली काढून सीमेवर शत्रू राष्ट्राबरोबर लढणाऱ्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. 

वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तिरंगा रॅली काढण्यात आली. याप्रसंगी गेवराई तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी झाले होते. गेवराई तालुका अध्यक्ष पप्पू गायकवाड उर्फ अजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली या रॅलीचेचे आयोजन करण्यात आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या