चित्रा न्युज प्रतिनिधी
पुणे : ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा न करता, त्यानिमित्ताने भारतीय सैनिकांचे आभार मानण्यासाठी आणि पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या निष्पाप नागरिकांसह पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या सन्मानार्थ पुणे येथे "तिरंगा रॅली" काढण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाड़ीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय महासचिव प्रियदर्शी तेलंग, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. नितीन ढेपे, पुणे शहर अध्यक्ष अरविंद तायडे, महिला अध्यक्ष अनिता चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या