Ticker

6/recent/ticker-posts

मालकातर ग्रामपंचायतीत ८,८४,५३८ रूपयांचा अपहार;भ्रष्टाचाराची चौकशी करून सरपंच व ग्रामसेवकावर कारवाई करा- बिरसा फायटर्सची मागणी

चित्रा न्युज प्रतिनिधी 
शिरपूर :-ग्रामपंचायत मालकातर येथील भ्रष्टाचाराची चौकशी करून सरपंच व ग्रामसेवकावर कायदेशीर कडक कारवाई करा,अशी मागणी बिरसा फायटर्स तालुका शाखा शिरपूर संघटनेकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती शिरपूर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,तालुकाध्यक्ष नरेंद्र पावरा,उपाध्यक्ष रवींद्र  पावरा,कार्याध्यक्ष विजय पावरा,सचिव शरद पावरा,सहसचिव दिनेश पावरा,प्रसिद्धीप्रमुख पवन सोलंकी आदि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
                   श्री.नरेंद्र जाड्या पावरा राहणार मालकातर यांचा बिरसा फायटर्स संघटनेकडे दिनांक २८/०३/२०२५ रोजी तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे.त्यानूसार ग्रामपंचायत मालकातर येथे मागासवर्गीय अनुदान निधीमध्ये  काम न करता रक्कम ४३८५०० रूपये व १५ वा वित्त आयोग अंतर्गत प्राप्त निधीतून केलेल्या  विकास कामांवर मूल्यांकनापेक्षा जास्त केलेला खर्च रू.४४६०३४ अशी एकूण ८८४५३८ रूपये एवढ्या रकमेचा गैरव्यवहार याबाबत सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.सरपंच व ग्रामसेवक हे मनमानी कारभार करून ग्रामपंचायत निधीचा गैरवापर करीत आहेत. पेसा निधी,१५ वा वित्त आयोगातील निधी परस्पर काढून कामे न करता मोठा प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे.तरी ग्रामपंचायत मालकातर येथील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधित सरपंच व ग्रामसेवकावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनास देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या