हळी हंडरगुळी येथे अनेक फायनान्स विना परवाना
एक लाख रुपयांला नव्वद दिवसासाठी दहा हजार रुपये व्याज !
शासनाला लावतात चूना..!!
चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-उदगीर तालुक्यातील हळी हंडरगुळी गावात फायनान्सच्या नावाखाली जनतेला लुटायच्या धंद्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.येथे अनेक फायनान्स चालू असून,यातील बरेच फायनांन्सला अधिकृत परवाना नाही. सहकार निबंधक खात्याने फायनान्सच्या नावाखाली गरीब व गरजूंना लुटण्याचे अलिखित परमीट दिले आहेत का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सविस्तर माहिती अशी की, हाळी-हंडरगुळी गावात लहान सहान व्यवसाय करणारे छोटे,मोठे व्यापारी आहेत. त्यांना रोज व्यवसाय करण्या - साठी खेळते भांडवल लागत असते म्हणुन याचा पुरेपूर फायदा घेऊन अनधिकृत फायनान्स चालविणा-या कांही ठगांनी सर्वसामान्य लोकांना लुटण्याचा गोरख धंदा मोठ्या प्रमाणात चालू केला आहे.सहकार निबंधक या कृष्ण कृत्य करणाऱ्या फायनान्स चालकांकडे दुर्लक्ष करीत असल्याने हा धंदा हळी हंडरगुळी गावात तेजीत चालू आहे.
एखाद्या फायनान्स चालकाने एखाद्या लाभार्थ्यांना पैसे दिले तर दररोज पिग्मी भरून घेतली जाते. परंतु, त्यांचे व्याज कमी करणे बंधनकारक असतानाही हे व्याज कपात केले जात नाही. नियमाने त्यांना पिग्मी जमा करता येत नाही. या फायनान्स चालकांकडे भांडवल खात नाही. तसेच फायनांन्सकडून शासनाकडे कोणत्याही प्रकारचे कर (टेक्स) भरले जात नाही. उलट शासनाला चूना लावला जातोय. प्रत्येक वर्षाला परवाना नूतनीकरण करून घ्यावे लागते. त्यांच्याकडे परवानाच नाही, तर नूतनीकरण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कोणत्याही शासकीय नियमांचे रजिस्टर नाही. फायनान्स रजी बोर्ड नाही.
जब मिल बैठेंगे चार यार..!
संबंधित यंञणेचे कांही नोकरदार हे अवैध फायनांन्स चालविणारे कांही टग्यासंगे 'लेग पीस व सोम रस' शेअर करतात.म्हणुन जब मिल बैठेंगे चार यार म्हणजे फायनान्सवाले व कांही टगे व प्रशासनातील नोकरदार व बोटी आणि कुप्पी ! हे चारजण अनेकदा एकञ दिसतात,असे हाळी मध्ये दबक्या आवाजात बोलले जाते.
तक्रार देऊन काय होणार?
असा उलट सवाल फायनांन्सवाल्या एका इसमाच्या मानसिक,शाररिक छळाचा सामना केलेल्या एका व्यक्तीने नाव गुप्त ठेवायच्या अटीवर केला आहे.
कारण,बेफाम व्याज वसूल करुन 'गब्बर' बनलेले कांहीजण पोलीसां- च्या गुड बूक मध्ये आहेत.म्हणुन हात दाखवुन अवलक्षण का.असे ही तो १ व्यक्ती म्हणाला.
तक्रार द्या कारवाई करतो असे उदगीरचे दुय्यम निबंधक अधिकारी बालासाहेब साधूजी नांदापुरकर यांनी आमच्याशी बोलताना सांगितले हाळी-हंडरगुळीत सुरु असलेल्या बेकायदा फायनांन्सची व त्यांच्याद्वारे गरजू लोकांची होत असलेल्या आर्थिक पिळवणुकीची माहिती मिळाली आहे.म्हणुन केवळ माहिती आधारे कारवाई करता येत नाही.तरी पिळले व लुटले गेलेल्यांनी रितसर तक्रार द्यावी.व तसे धाडस करणा-या तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवले जाईल. असे नांदापूरकर म्हणाले.


0 टिप्पण्या