Ticker

6/recent/ticker-posts

पुणे विद्यापीठात पुन्हा तथागत बुद्धांच्या मूर्तीची स्थापना!

सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या मागणीला यश!

चित्रा न्युज प्रतिनिधी 
पुणे : काही दिवसांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तथागत गौतम बुद्धांची मूर्ती विद्यापीठ प्रशासनातील लोकांकडून  हटविण्यात आली होती. या गोष्टीचा विरोध वंचित बहुजन आघाडीप्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाने केला होता.

विद्यार्थ्यांनी याविरोधात आवाज उठवल्यामुळे विद्यापीठाने 50 भिक्कूच्या उपस्थितीत विद्यापीठातील शैक्षणिक विभागाला भेट देण्यात आली. बुद्ध पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर त्याठिकाणी पुन्हा बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात आली.

यावेळेस सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पुणे शहर अध्यक्ष चैतन्य प्रभाकर इंगळे, उपाध्यक्ष प्रज्योत गायकवाड, संघटक ओम तांबे, सुरज केळगंद्रे, दिपक कांबळे, आदी उपस्तिथ होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या