चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर:-बार्शी येथील १६९० झाडबुके मैदानावर सिद्धार्थ तरुण मित्र मंडळाच्यावतीने बौद्ध पौर्णिमा व तथागत गौतम बुद्ध जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि शांततामय वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
उत्सवाच्या समारोपानंतर सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी अरुण शेंडगे व प्रज्ञा शेंडगे यांनी मंडळाला सहकार्य केले. त्यांच्या या योगदानाबद्दल मंडळाच्यावतीने सौ. सारिका पाचपुडवे आणि बाबासाहेब पाचपुडवे यांच्या हस्ते शेंडगे दाम्पत्याचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अक्षय भालेराव होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद ननवरे, सोमनाथ ननवरे, सुदर्शन कांबळे, कृष्णा ननवरे, संतोष बोकेफोडे, उत्तम चौधरी, सनी सोनवणे, अजय कांबळे, मधुकर लोंढे, दिनेश लोंढे आणि राजू चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमाची सांगता सामूहिक बुद्ध वंदना आणि विचारप्रवण भाषणांनी झाली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या