चार जणांना अटक, रोख १५४० रुपये व जुगार साहित्य जप्त
चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर:- बार्शी तालुक्यातील मौजे मानेगाव येथे परवानगीशिवाय रम्मी नावाचा बेकायदेशीर जुगार खेळणाऱ्या चार जणांवर वैराग पोलिसांनी कारवाई करत त्यांना अटक केली. यावेळी पोलिसांनी रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण रु. १५४० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई ३० मे २०२५ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. डीबी पथकातील पोलीस कर्मचारी आकाश पवार (बकल नं. ७९७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिस निरीक्षक कुंदन तुकाराम गावडे यांच्या आदेशावरून पोसई जाधव, पोहेकॉ. १४०९ भोरे व अन्य पोलिस पथकाने ही धडक कारवाई केली.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मौजे मानेगाव येथे तुकाराम विश्वंभर कानडे यांच्या परमीट रूमच्या बाजूला काही संशयित व्यक्ती रम्मी नावाचा जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून खालील चार आरोपींना अटक केली:
1. नितीन शांतीनाथ ताटे (वय ४४)
2. सागर शहाजी बनसोडे (वय २६)
3. लक्ष्मण परसू हजारे (वय ३०)
4. विठ्ठल ज्ञानदेव हजारे (वय ५५)
सर्व रा. मानेगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर
तपासादरम्यान पंचांसमक्ष या आरोपींची झडती घेतली असता त्यांच्या कब्ज्यातून १५४० रुपये रोख रक्कम व ५२ पत्त्यांची पाने जुगारासाठी वापरले जात असल्याचे आढळले. त्यामुळे पोलिसांनी सर्व साहित्य जप्त केले असून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ चे कलम १२(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैराग पोलिस करत आहेत.
0 टिप्पण्या