Ticker

6/recent/ticker-posts

वंचित बहुजन आघाडीची निलंगा तालुका कार्यकारणी निवड बैठक पार पडली


चित्रा न्युज प्रतिनिधी 
निलंगा : वंचित बहुजन आघाडी लातूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सलीम सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तसेच पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून विविध तालुक्याच्या तालुका समित्याची नेमणूक करणे बाबत बैठका सुरू आहेत. त्या अनुषंगाने शासकीय विश्रामगृह निलंगा येथे वंचित बहुजन आघाडीचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यासाठी लातूरहून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव तथा (निलंगा तालुका कार्यकारणी निवड समिती प्रमुख) प्रा. प्रशांत उघाडे, माजी जिल्हा उपाध्यक्ष अंकुश कांबळे, सोनेराव बनसोडे, सिराज शेख, आदी मान्यवर उपस्थित होते. निवड बैठकी दरम्यान उपस्थितांची सभासद नोंदणी करून घेण्यात आली. तालुका कार्यकारणीवर काम करण्याची इच्छा असणाऱ्या इच्छुकांकडून अपेक्षित पदांकरिता नोंदणी फार्मद्वारे नोंद घेण्यात आली.

प्रा. प्रशांत उघाडे म्हणाले की, पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली पाहिजे, तालुक्यात जवळपास ८७ गावे आहेत. प्रत्येक गावात शाखा निर्माण झाली पाहिजे तसेच, विविध प्रभाग, वार्डात, बूथ बांधणी, करून, सर्व ताकदीने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सामोरे जाण्यासाठी  वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी सक्षम असले पाहिजे असे मत मत व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या