Ticker

6/recent/ticker-posts

जातीय शिवीगाळ, धमकी आणि धक्कादायक प्रकार!पीडित नागरिकाचा पोलिसांत ठणठणीत आवाज – FIR दाखल


चित्रा न्युज प्रतिनिधी 
नांदेड:- जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील हाडोळी (ज) गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अनुसूचित जातीतील नागरिकावर मराठा समाजातील व्यक्तीकडून जातीय शिवीगाळ, मारहाण आणि जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. पीडित बाबाराव गायकवाड यांनी माळाकोळी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर संबंधित आरोपीविरुद्ध अ.जा./अ.ज. अत्याचार प्रतिबंधक कायदा व भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

११ मे २०२५ रोजी रात्री ९.३० च्या सुमारास घरात जेवण करत असताना आरोपी नारायण गायकवाड हा घरात घुसून "माझं नाव संशयित म्हणून का घेतलंस" असा सवाल करत शिवीगाळ करू लागला. "महारग्या, धेडग्या तुला व तुमच्या समाजाला फुकून टाकतो" अशी जातीय भाषा वापरून धमकी देण्यात आली. पीडित व त्यांची पत्नी यांना ढकलण्यात आले. गावातील काही नागरिकांनी प्रसंगावर पडदा टाकला.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून दलित समाजात संतापाची लाट आहे. पोलिसांनी वेळीच FIR दाखल करून गुन्हा नोंदविला असून तपास सुरू आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या