Ticker

6/recent/ticker-posts

नुतन सपोनी.एस.पी.गायकवाड यांची कामगिरी लय भारी ..!!

30 हजाराच्या मुद्देमालासह एक आरोपी पकडला हातभट्टीच्या गुत्त्यावरी ..!!

 
चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-उदगीर तालुक्यातील वाढवणा बू.व परिसरात अवैध देशी,विदेशी दारु व हातभट्टीची विक्री व वाहतूक उघड- उघड होत आहे.अशी ओरड वाढोणा गाव भागातुन होत होती.तरीपण या धंद्यावर कारवाईचे धाडस कुणी केले नव्हते.पण दि.११ रोजी वाढवणा बू. येथील ठाण्यात नव्याने आलेले व तत्काळ चार्ज घेतलेले एपीआय.एस. पी.गायकवाड यांना माहिती गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळताच त्यांनी विश्वासू डेअरिंगबाज पोलीस कर्मचा-यांचे एक स्काॅड तयार केले व त्यात स्वत: सहभागी होत उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकी तंड्यावर रेड केली.आणि तेथे आरोपी उत्तम भागवत राठोड वय ४७ डोंगरशेळकी तांडा,ता.उदगीर हा आरोपी वसंत पवार यांच्या शेताशेजारील गायरान जागेत 200 लि.चे 2 निळ्यारंगाच्या व 35लिटरचा 1,अशा 3 ड्रॅम मध्ये आंबट व उग्र वास येत असलेली गावठी हातभट्टीची दारु बनविण्यास लागणारे गुळ मिश्रित फसफसते रसायण 435 लि.ज्याची किंमत 70 रुपये लिटरप्रमाणे असलेली 30450 ₹ ची हातभट्टी दारु तयार करायच्या उद्देशाने जवळबाळगल्याचा मुद्देमाल या रेड मध्ये वरील आरोपी जवळ मिळून आला.
आरोपीविरुध्द पो.स्टे.वाढवणा येथे गुरनं.172/25 कलम 65 (फ) दारु बंदी कायद्यान्वये हे.काॅ.टी.टी.बळदे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद झाला. सदर गुन्ह्याचा तपास Api सुनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली  पोना.संजय कलकत्ते हे करत आहेत
या रेड मध्ये हेकाॅ.एस.पी.रंगवाळ व महिला कर्मचारी यांनीही सहभाग घेतला होता.
वाढवणा ठाण्याचा कारभार हाती घेतल्या दुस-याच दिवशी पोलीस सहका-यांसह स्वत: एपीआय, एस.पी.गायकवाड यांनी धडाकेबाज कामगिरी केल्यामुळे अवैध 2 नंबर धंदेवाल्यांची पातळ झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या