चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा- दिनांक 15 जून रोजी दुपारी 4.00 वाजता, दसरा मैदान, शास्त्री चौक, भंडारा येथे
बुद्धगया बिहार येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी चार महिन्यांपासून महाबोधी महाविहार परिसरात आंदोलन सुरू आहे. बीटी ऍक्ट 1949 चा कायदा रद्द करण्यात यावा व कायद्यातील तरतुदीनुसार नऊ सदस्यां मध्ये बुद्धिस्ट समाजातील सदस्यांचा समावेश करण्यात यावा या मागणीसाठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली.
सदर कार्यक्रमाला ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पूज्य भन्ते चंद्रकीर्ती, जनरल सेक्रेटरी ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरमचे आदरणीय डॉ. आकाश लामा, आदरणीय चंद्रबोधि पाटील ट्रस्टी चेअरमन बीएसआय, पूज्य भदंत धम्मतप राजनांदगाव छत्तीसगड, समता सैनिक दलाचे प्रकाश दर्शनीक, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक सुनील सारीपत्त, बुद्धगया महाबोधी महाविहार आंदोलनातील उपस्थित असलेले भंते सायरन, माननीय पुसे साहेब भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र संघटक, भिखुनी संघप्रिया प्रामुख्याने मंचकावर उपस्थित होते.
भंडारा शहरातील दसरा मैदान येथील कार्यक्रमाच्या ठिकाणी भंते डॉ चंद्रकीर्ती तथा भंते डॉ आकाश लामा यांचे सभास्थळी आगमन होताच, सर्व उपासक उपासिकांनी पुष्पांचा वर्षाव करून स्वागत केला.
कार्यक्रमाची सुरुवात महाकारूणी तथागत भगवान गौतम बुद्ध तथा क्रांतीसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदनेने करण्यात आली. सदर उपस्थित डॉ. आकाश लामा यांनी बुद्धगया येथील 124 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची दखल संसदेतील बुद्ध समाजाच्या खासदारांनी घेतली असून, बीटी ऍक्ट 1949 रद्द करण्याचा कायदा संसदेत मांडणार असल्याचे सांगितले त्याचप्रमाणे जोपर्यंत सुप्रीम कोर्ट न्याय देणार नाही तोपर्यंत संपूर्ण देशभर संविधानिक मार्गाने सर्व बुद्ध अनुयायांनी दिनांक 1 जुलै ते 31 जुलै पर्यंत आपापल्या जिल्ह्यात मुख्य ठिकाणी व तालुक्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन करण्याचे सांगितले, तसेच सोशल मीडियाचा गैर वापर करून आंदोलनाची दिशा व आंदोलन भरकविण्याच्या प्रयत्न करणाऱ्या विरोधकांना त्यांनी सडेतोड उत्तर दिले. तसेच भंते विनयशील यांना बौद्धगया येथे का अटक करण्यात आली यांचा खुलासा केला. तसेच दिनांक 1 जुलै रोजी डॉक्टर आकाश लामा आहे उपसंपदा घेऊन भिक्कू होण्याचे जाहीर केले. बीटी एक्ट 1949 रद्द करण्यासाठी, महाबोधी महाविहार संस्थेत सर्व नव पदाधिकारी बुद्धिस्ट नेमणूक करावी अशी जाहीर मागणी देखील सभेतून केली, जोपर्यंत महाबोधी महाविहार मुक्त होणार नाही, तोपर्यंत लढा देणार असा निर्धार केला, जरी या लढ्यात प्राण गेले तरी चालेल व हा लढा निरंतर सुरू राहणार असे सांगितले.
त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष भंते डॉ चंद्रकीर्ती यांनी आंदोलनाची पुढील दिशा व आंदोलनाच्या तिसरा टप्प्यात जास्तीत जास्त बौद्ध अनुयायी यांनी सर्व सामाजिक व धार्मिक संघटनांना एकत्र घेऊन लढा यशस्वी करण्याकरता सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. 134 वर्षापासून इंग्रजांच्या राजवटीत लागू केलेला बीटी ॲक्टच्या कायदा निरस्त करण्यासाठी बिहार सरकारने व केंद्र सरकारने तत्काळ पावले उचलावी अन्यथा देशात आता चिवरधाऱ्यांना मैदानात उतरून सरकारचा विरोध करावा लागेल असा कडकडीत इशारा दिला.
सदर वेळी उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे चंद्रबोधि पाटील, समता सैनिक दलाचे राज्य संघटक प्रकाश दर्शनीक यांनी सभेला संबोधित केले.
सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी छत्तीसगड राजनांदगाव येथून आलेले भंते धम्मतप यांनी आशीर्वाद गाथा बोलून उपस्थितांना साधू वाद केला. तसेच जमा झालेला एकूण अर्थदान 43000 रुपये रोख रक्कम तथा सहा क्विंटल तांदूळ, दोन क्विंटल गहू तथा तूवर डाळ तथा इतर धान्य आदरणीय भंते चंद्रकीर्ती यांना समितीच्या वतीने सुपूर्त करण्यात आले,
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीतां युवराज रामटेके, शशिकांत भोयर, मनोज बागडे, मनोज खोब्रागडे, अचल मेश्राम, विनय बनसोड, असित बागडे, नाशिक चवरे, पुराणदास लोणारे, सुरेंद्र बनसोड, , दिनेश वासनिक, प्रभाकर मेश्राम, सुरज डोंगरे, विलास मेश्राम, नितीन रामटेके, दीपक जनबंधू, रोशन फुले, हंसराज वैद्य, मनोज गोस्वामी, डॉ. देवानंद मेश्राम, मदनपाल गोस्वामी, राजेश मडामे, विनोद रामटेके, डॉ. रतनकुमार गेडाम, अमोल मेश्राम तथा समता सैनिक दल मार्शल इत्यादींनी सहकार्य केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत भोयर, स्वागत मनोज बागडे व प्रास्ताविक डॉ अश्वविर गजभिये यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन असित बागडे यांनी मानले.
0 टिप्पण्या