Ticker

6/recent/ticker-posts

नाभिक समाजाची तेजस्वी कन्याकुमारी कादंबरी प्रवीण नक्षीने



चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती :  बल्लारपूर येथील नाभिक कन्या  कु. कादंबरी प्रवीण नक्षिने हिने दहावीच्या परीक्षेत 97.20% गुण मिळवून अपूर्व यश मिळवले आहे.
ही यशाची शिखरं गाठलेली कन्या दिलासा ग्राम कॉन्व्हेंट, बल्लारपूर या शाळेची विद्यार्थिनी असून तिच्या या यशामुळे संपूर्ण नाभिक समाज, बल्लारपूर तालुका आणि चंद्रपूर जिल्ह्याचा सन्मान मोठ्या अभिमानाने उंचावला आहे. ही यशोगाथा फक्त कादंबरीची नाही, तर तिच्या कुटुंबीयांची, विशेषतः आमचे मार्गदर्शक माननीय श्री. प्रवीण भाऊ नक्षीने यांचेही आहे. त्यांनी दिलेले संस्कार, मार्गदर्शन आणि प्रेरणा आज समाजाला गर्वाने मस्तक उंच करण्यास भाग पाडते असे मत जय जिवाजी क्रांती सेना महाराष्ट्र राज्य, प्रदेश अध्यक्ष गणेश भाऊ नकर यांनी  व्यक्त कले. कादंबरीचे हार्दिक अभिनंदन  आणि तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
आज नाभिक समाजाला एक नवसंजीवनी लाभली आहे.
ही यशोगाथा अनेक नव्या पिढ्यांना प्रेरणा देणारी ठरेल, अशी आम्ही खात्री बाळगतो!अभिनंदन कादंबरी
तू पुढे चालत राहा, समाज तुझ्या पाठीशी सदैव आहे, अशा अभिनंदन व शुभेच्छा  जय जिवाजी क्रांती सेना सघटनेच्या वतीने दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या