चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी | सपोनि.एस.पी.गायकवाड यांनी
ज्या गावच्या परिसरात गत १५ दिवसात २ मोठ्या रेड करुन लाखो रुपयांची हातभट्टीची दारु व आरोपी पकडले.त्याच एरियात दि.२८ रोजी दु.१२.४० वा.८४ हजारची हातभट्टी पकडली.म्हणजे रेडवर रेड केल्या तरीही या अवैधधंदेवाल्यांमध्ये थोडी ही नितीमत्ता दिसत नाही.आणि म्हणुनच नितीमत्तेचा जेथे खचतो पाया,जाबाॅंज सपोनि.गायकवाड एस.पी.यांची धडाकेबाज एंन्ट्री होते तेथे.असे म्हणणे चूक ठरणार नाही.
या बाबत पोलिस सुञाकडून समजते असे की,उदगीर तालुक्यात आणि परराज्यात प्रति पंढरपुर म्हणुन प्रसिध्द असलेल्या डोंगरशेळकी या नावाने असलेल्या डोंगरशेळकी तांड्यात आरोपी उत्तम भगवान राठोड हा स्वत:च्या फायद्यासाठी हातभट्टीची दारु तयार करुन विक्री करत असल्याची टीप मिळताच वाढवणा ठाण्याचे जाॅंबाज सपोनि. एस.पी.गायकवाड यांनी पोहेकाॅ.एस.पी दळवे-पाटील, हेकाॅ.एस.के.रंगवाळ याडेअरींगबाज सहका-यासह रेड केली, असता आरोपी उत्तम राठोड हा स्वत:च्या फायद्यासाठी व विक्री साठी हातभट्टी तयार करण्यासाठी स्वत:च्या कब्जा मध्ये बाळगलेले निळ्यारंगाचे दोनशे लिटर क्षमतेचे दोन ड्रम,दोन लोखंडी ड्रम व चार शंभर लिटर क्षमतेचे ड्रम त्यात आंबट व उग्रवास असलेली गावठी दारु हातभट्टी बनविण्यासाठी लागणारे गुळमिश्रित फसफसणारे रसायन एकुण १२०० लिटर प्रति लिटर ७० रुपये प्रमाणे ८४ हजार रुपयाचा मुद्दे माल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी फरार झाला आहे,म्हणून याबाबत एस.पी.दळवे- पाटील यांनी फिर्याद दिलेवरुन आरोपी विरुध्द गुरनं.१८८ - २०२५ कलम-६८ {फ},महाराष्ट्र दारुबंदी कायदा यानूसार गुन्हा नोंद केला आहे.व याचा पुढील तपास वरिष्ठां - च्या आदेशान्वये पोकाॅ.संजय कलकत्ते हे करत आहेत.
0 टिप्पण्या