Ticker

6/recent/ticker-posts

कु. स्वराली फेरे दुबई येथिल विंग्ज पब्लिकेशन इंटरनॅशनल या संस्थेच्या वतीने सुवर्णपदक, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित

चित्रा न्युज प्रतिनिधी
चिंचवड:- चिंचवडे नगर येथील कु. स्वराली फेरे या युवतीने वयाच्या १३ व्या वर्षी "सिक्रेट अनटोल्ड" हे  काल्पनिक दंत कथेवर आधारित पुस्तक लिहून प्रसिद्ध केले होते.या पुस्तकाला जगभरातील विविध देशांत व देशांतर्गत चांगला  प्रतिसाद मिळाल्याने दुबई येथिल विंग्ज पब्लिकेशन इंटरनॅशनल या संस्थेच्या वतीने रविवार दिनांक २२जून रोजी तिला "आंतरराष्ट्रीय सर्वोत्कृष्ट लेखिका" या पुरस्काराने ,दुबई येथील उद्योजक,जेष्ठ लेखक,समीक्षक व प्रख्यात वकील डॉक्टर कैलास पिंजाणी यांचे हस्ते सुवर्णपदक, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी जगभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करीत असलेले १०२ सन्मानार्थी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. 
मुळची लातूर येथील असलेल्या स्वरालीचे प्राथमिक पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण अमेरिकेतील न्युजर्सी शहरातील पारसीपनी विभागातील नाॅर्थ वेल या शाळेत झाले.त्यानंतर ती वडील प्रदीप फेरे यांच्या नोकरी निमित्ताने चिंचवड येथील चिंचवडे नगर येथे स्थायिक झाली. तिचे माध्यमिक आठवी ते दहावीचे शिक्षण एलप्रो इंटरनॅशनल स्कूल चिंचवड येथे झाले.नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत तिला ९३% टक्के गुण प्राप्त झालेले आहेत. हिंजवडी येथील कंपनीत अभियंता पदावर कार्यरत असलेले तिचे वडील कामावरून घरी आल्यानंतर विविध नामांकित लेखकांची मराठी भाषेतील पुस्तके आजही वाचतात व दैनंदिनी लिहतात.वडीलांची वाचनाची व लेखनाची प्रेरणा लहानपणीच म्हणजे वयाच्या सातव्या वर्षीपासून तिने घेतली .ती म्हणते प्रथम मी पप्पांसारखी  दैनंदिनी लिहायला लागले. स्वच्छ व सुंदर अक्षरांत ते काम मी न चूकता आजही करते.करोना काळात मिळालेल्या वेळेचा उपयोग मी अनेक इंग्रजी व मराठी भाषेतील पुस्तके वाचनासाठी केला. याच काळात मला  ॲशले ही एक हुशार, बुद्धीमान, चांगल्या स्वभावाची आणि सतत दुसऱ्यांसाठी चांगले काम करणारी मुलगी पण चेटकीण तीने तीच्या तीन मैत्रीणींना मानवी वाईट जोखडातून शिताफीने सोडविले हे कथानक आठवले व मी ते  २९ भागांत शब्दबद्ध केले.या पुस्तकातील काल्पनिक कथा वाचकांना खूपच आवडल्या आहेत.आजपर्यंत अमेझाॅन ऑनलाईनवरती व विविध ठिकाणच्या पुस्तक प्रदर्शनात सिक्रेट अनटोल्डच्या या पुस्तकाच्या प्रती हजारोंच्या संख्येने विकल्या गेल्या आहेत. ०१ जानेवारी २०२३ मध्ये मला अमेझॉन कंपनीने उत्कृष्ट लेखिका व  नंबर वन बेस्ट सेलर ॲवॉर्ड देऊन सन्मानित केले होते. जेव्हा जागतिक स्तरावर मला ॲवॉर्ड मिळणार आहे असे समजले तेव्हा मला देशासाठी, राज्यासाठी, माझ्या गावांसाठी , माझ्या कुटुंबासाठी माझे कार्य सार्थकी लागले याचे समाधान मला मिळाले असे मानते. फेब्रुवारी २०२२ मध्ये लातूर जिल्ह्यातील पळसप येथे झालेल्या ९ वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनात मला सन्मानित करण्यात आले होते.तसेच आमदार विक्रम काळे आणि आमदार अमित देशमुख यांनी फोनद्वारे माझे अभिनंदन केले आहे.मला सदैव मदत करणारी माझी आई आणि इतर सर्व लोक यांची सदैव मी ऋणी असेन. शेवटी ती म्हणाली की, माझ्या तरुण मित्र -मैत्रिणींनी मोबाईलच्या आहारी न जाता मिळेल त्या वेळेचा उपयोग अभ्यासासाठी व आपले छंद जोपासण्यासाठी केला तर निश्चितपणे आईवडिलांच्या कष्टांचे चीज  आपल्याकडून होईल. 
मी प्रथम शैक्षणिक शालेय अभ्यासक्रमाला प्राधान्य देऊन, फावल्या वेळेत स्विमिंग ,डान्सिंग,गायन तसेच मुव्ही पाहणे हे छंद देखिल आवडीने जोपासते.औ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या