Ticker

सन्मान द्या व सन्मान या सामाजिक उपक्रमांतर्गत पत्रकार संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त १० रक्तदात्यांनी केले रक्तदान

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा -प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस दैनिक माझ्या मराठवाडा विदर्भ विभागीय संपादक व जनता टाईम /जटा टीवी चे प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्या 9 जून 2025 ला वाढदिवसानिमित्त सन्मान द्या सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमांतर्गत 10 रक्तदात्यांनी रक्तदान केले . यात अनुक्रमे नितेश अंबादास कुंभलकर, निलेश सच्चिदानंद लेंडारे, अमित रवींद्र शिवणकर, संदीप अनिल राऊत ,वैभव नेमीचंद लेंडारे, लोकनाथ दादाजी रायपुरे, अक्षय विठ्ठल गणवीर,विलास बेनीराम बांडेबुचे, निखिलेश प्रकाश कांबळे, राहुल घनश्याम गणवीर यांचा समावेश आहे.रक्त डोनेट करण्याकरिता भंडारा येथून समर्पण  ब्लड बँक चे सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. या ब्लड डोनेट शिबिराला दैनिक माझा मराठवाडा चे मुख्य संपादक दशरथ सुरडकर ,माजी खासदार खुशाल बोपचे ,जनता टाईम जटा ,टीवी चे मुख्य संपादक निखिलेश कांबळे ,सविधान संघर्ष समितीचे भंडारा जिल्हाध्यक्ष रोशन जांभुळकर ,प्राध्यापक राजेश नंदपुरे, साहित्यिक अमृत बनसोड, शांतीवन बुद्धविहाराचे संचालक जीवन बोधी बौद्ध  यांनी भेट दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या