Ticker

6/recent/ticker-posts

हंडरगुळीत जागोजागी डबके!!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-यंदा मोसम व गरज नसताना सुध्दा मे महिण्यात अवकाळी पावसाने या परिसराला झोडपल्यामुळे गावात कांही ठिकाणी असलेल्या सखल भागात साचले होते.२८ मे ते ८ जून पर्यंत पाऊस न पडल्याने साचलेले पाण्याचे डबके कोरडे झाले होते.पण दि.८व९जून रोजी पडलेल्या मोसमी पावसामुळे गावातील अनेक भागात असलेल्या खड्यात पाणी साचल्याचे दिसते.यामुळे पाण्याच्या डबक्यातून वाट काढताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते.तर डबक्यात साचलेल्या पाण्यातून पायी ये-जा करणा-यांना त्वचा रोग होऊ शकतो. म्हणुन विकासाच्या *बुलेट ट्रेन*मध्ये बसलेल्या ग्रा.पं.सत्ताधा-यांनी जरा या डबक्याकडे पण बघावे,अशी माफक अपेक्षा हंडरगुळीकरांची आहे.
यंदा मे मध्ये अवकाळी पाऊस झाला तेंव्हा सखल भागात पाणी जमले.ते डबके पाण्याविना कोरडे होण्याला जुन उजाडावा लागला.कारण,मे मध्ये सलग १५ दिवस पाऊस होता. त्यानंतर ८ जुन पर्यंत कडक उन होते म्हणुन ते पाण्याने डबडबलेले डबके कोरडे झाले होते.पण ८,९ जुन रोजी मोसमी पाऊस पडल्यामुळे छञपती शिवाजी चौक ते साठे चौक तसेच महादेव मंदीर रोड आणि जुन्या बस थांब्याकडे जाणा-या रोडवर ग्रा.पं. जवळ!असे अनेक ठिकाणी पाणी साचलेले दिसते,यात मंदीराकडे जो रोड गेलाय त्याच्या एका बाजुने एक महिण्यापुर्वी बनवलेली नाली रोड पेक्षा उंच बनली असल्याने पाण्याला जाण्यासाठी वाटच नाही.परिणामी मंदीराकडे जाणा-या रोडवर चिखल व पाण्याचे डबके जागोजागी दिसते. तसेच ग्रा.पं.पुढून जुन्या बस थांब्या कडे जाणा-या ठिकाणी पण अशीच अवस्था आहे.यामुळे प्रवाशांसह सर्व सामान्यांना घाणपाण्यातून पायधूनी करुन ये-जा करावी लागते,



सडकछाप पोरं उडवतात पाणी

छञपती शिवाजी चौकातून मंदीर जाणारा व साठे चौकाकडे जाणारा रोड म्हणजे हंडरगुळी गावात जाणारे मुख्य रस्ते आहेत,आणि याच रोडवर अनेक ठिकाणी खड्डे आहेत,त्यामध्ये पाणी साचते व परिसरात चिखल असतो.तसेच मंदीराकडे जाणा-या रोड लगत परवाच बनवलेली नाली ही रोड पेक्षा उंच बनवल्यामुळे पाणी रोडवरच्या डबक्यात व अनेकांच्या दारात चिखलासह साचलेले दिसते. व या मार्गे ये-जा करणा-यांना याचा विशेषत: महिलाभगीणींना सर्वाधिक ञास सहन करावा लागतोय.
कारण,गावचे तसेच शेजारचे कांही *सडकछाप पोरं* त्यांच्या हातातील *बाईक* ही पाण्याच्या डबक्यातून एकदम जोरात चालवितात.तेंव्हा त्या डबक्यातील घाण पाणी महिलांच्या अंगावर उडते.अशी कुजबूज आहे. तेंव्हा गावात गल्ली तेथे विकास ही मोहिम सुरु करणा-या सत्ताधा-यांनी विकासाच्या*बुलेट ट्रेन*मधून थोडे या डबक्या सह*सडकछाप गॅंग*कडे पण बघावे, अशी माफक अपेक्षा वजा मागणी सर्व जनतेची आहे.  —————————————— 
या प्रकरणात त्वरीत जातीने लक्ष घालणार व पाण्याचे डबके होणार नाहीत.यासाठी लवकरच उपाय केले जातील.विजय अंबेकर,सरपंच

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या