चंद्रकांत रघुवंशीविरोधात एकजूटीने लढण्याची गरज- सुशिलकुमार पावरा
चित्रा न्युज प्रतिनिधी
नंदूरबार :-महाराष्ट्रात २५ विधानसभा मतदारसंघ हे आदिवासींसाठी राखीव आहेत. दर पंचवार्षिकला २५ आदिवासी आमदार निवडून येतात. गेल्या पंचवार्षिकला आदिवासींचे एकूण २७ आमदार होते.राखीव मतदारसंघातून निवडून आलेले २५ आमदार, किनवट या खुल्या मतदारसंघातून निवडून आलेले एकमेव आदिवासी आमदार भीमराव केराम व उद्ववजी ठाकरे शिवसेना प्रमुख यांच्या कृपेने विधानपरिषद वर घेण्यात आलेले आमशा पाडवी,असे एकूण २७ आदिवासी आमदार होते.परंतू विधानसभा निवडणुक, २०२५ मध्ये अक्कलकुवा अक्राणी या राखीव मतदारसंघातून विधानपरिषदचे ३ वर्षे शिल्लक असणारे आमदार आमशा पाडवी हे निवडून आले.एक व्यक्ती २ आमदार पदावर राहू शकत नाही.म्हणून त्यांना विधानपरिषदची एक जागा सोडावी लागली.आमशा पाडवी ऐवजी अन्य उमेदवार निवडून आला असता तर आदिवासींचे एकूण आमदार २७ राहिले असते.
आमशा पाडवी यांच्या जागेवर बिगर आदिवासी चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी हे विराजमान झाले.त्यामुळे चंद्रकांत रघुवंशी यांनी एक आदिवासी आमदार कमी केला.आदिवासी आमदारांचे संख्याबळ कमी केले.आदिवासींच्या जागेवर विराजमान झालेले चंद्रकांत रघुवंशी हे नंदूरबार जिल्ह्य़ातील अक्कलकुवा, शहादा,नवापूर व नंदूरबार हे ४ मतदार संघ आदिवासींसाठी राखीव असतांना यापैकी शहादा व नंदुरबार हे २ विधानसभाक्षेत्र खुले मतदारसंघ करण्याची मागणी करत आहेत.त्यामुळे शहादा मतदारसंघाचे विद्यमान भाजपचे आमदार राजेश पाडवी व नंदुरबार मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार डाॅ.विजयकुमार गावित यांनी या चंदूभैयापासून सावध राहिले पाहिजे. सरकार कोणत्याही पक्षाचे आले तरी सत्ताधारी आदिवासी आमदारांना शुन्य किंमत देतात. कारण मागे पेसा भरतीच्या मागण्यांसाठी सत्तेवर असणारे नरहरी झिरवाळ उपसभापती यांच्या नेतृत्वात आदिवासी आमदारांना मंत्रालयाच्या जाड्यावर जीवघेण्या उड्या माराव्या लागल्या होत्या.
कित्येक वर्षांपासून आदिवासी बांधव जमीन कसूर खात आहेत, ती जमीन आदिवासींच्या नावावर झाली नाही.सरकारी म्हणजेच वनखात्याच्या नावे आहे. आदिवासी उमेदवारांना शिक्षण घेऊनही नोकरीचा प्रश्न आहे.धनगर आदिवासींत आरक्षण मागत आहेत. बोगस आदिवासींनी लाखों नोक-या बळकावल्या आहेत. नंदूरबार जिल्ह्य़ात आदिवासी मजुरांचा स्थलांतराचा मोठा प्रश्न आहे.१० टक्के आदिवासींची लोकसंख्या असतांना देखील आदिवासींचा आवाज ऐकला जात नाही.आदिवासी समाज सत्ता केंदावर नाही.म्हणून आदिवासी आमदारांनी आपले पक्ष बाजूला ठेवून दबावगट निर्माण करणे आवश्यक आहे.त्यासाठी आदिवासी आमदारांची संख्यासुद्धा जास्त असणे आवश्यक आहे.परंतू चंद्रकांत रघुवंशी मुळे आदिवासींचा एक आमदार कमी झाला.भविष्यात नंदूरबार जिल्ह्य़ातील शहादा व नंदुरबार असे २ मतदारसंघ खुले करण्याची मागणीतून आदिवासी आमदारांची संख्या कमी करण्याचा डाव सुरू आहे.तो आपण एकजूटीने हाणून पाडला पाहिजे.भूमाफिया विरोधात,जमीन साठी व मतदारसंघ राखीव राहावेत,म्हणून आरक्षण साठी आम्ही आदिवासी संघटना लढत आहोत, ती लढाई साधी नाही आहे.आम्ही आदिवासी समाजासाठी व या आमदार खासदार यांचे राजकीय आरक्षण वाचण्याचे काम सुद्धा करीत आहोत. आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे,भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी चले जाओ, अशी जोरदार प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.
0 टिप्पण्या