Ticker

6/recent/ticker-posts

हंडरगुळीत नालीचे बांधकाम सुरु..



चित्रा न्युज प्रतिनिधी

लातूर  :-हंडरगुळी येथील आदर्श काॅलनी भागात हांडे वामन व बालाजी कोटगीरे यांच्या घरा समोरुन एमएसईबी कार्यालया- कडे जाणा-या रोडच्या दुर्तफा नाली बांधकाम दि.६ जून रोजी शिवराज्या भिषेक दिनाच्या शुभ मुर्हूतावर या भागातील नागरीकांच्या हस्ते श्रीफळ फोडून सुरु करण्यात आले आहे.
आदर्श काॅलनी हंडरगुळी येथील नागरीकांची नाली अभावी होणारी अडचण,गैरसोय व मागणी लक्षात घेऊन उपसरपंच बालाजी पाटील यांनी तत्काळ १५ व्या वित्तआयोगा मधून ३ लक्ष रुपयांची मंजूरी आणून नाली बांधकामाला प्रत्यक्षात प्रारंभ केला आहे.म्हणुन परिसरातील सर्व जनता प्रशासनाचे विशेष करुन उपसरपंच बालाजी भोसले पाटील यांचे आभार मानत आहेत.
नाली बांधकाम शुभारंभ प्रसंगी सरपंच विजय अंबेकर,उपसरपंच बालाजी भोसले पाटील,ग्रा.वि.अ. एस.आर.कांबळे,माजी सरपंच मगदूमसाब शेख,पञकार विठ्ठल पाटील,सदस्य सुनिल कांबळे,अंकूश अनलदास,वामन हांडे,पिंन्टू गुद्दे,बी. आर.कोटगीरे,नितीन भोसले,नंदू भालेराव,भैय्या माने,संभाजी निटूरे हे  उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या