ॲड. वामनराव चटप यांची उपस्थिती.
चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती. : प्रकल्प उभारणीसाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा ताबा एमआयडीसीला केवळ कागदोपत्री दिला असून जमिनीचा मोका ताबा अध्याप दिलेला नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्त आपल्या हक्कासाठी रस्त्यावरची व न्यायालयीन लढाई लढू शकतात असे मत व्यक्त करून माजी आमदार तथा शेतकरी नेते ऍड वामनराव चटप यांनी भूसंपादनाविषयी जुने दाखले देत प्रकल्पग्रस्तांना मार्गदर्शन केले व निप्पाण प्रकल्पग्रस्तंची न्यायालयीन लढाई निशुल्क लढवण्याची ग्वाही त्यांनी प्रकल्पग्रस्तांना दिली. शहरातील शुभप्रसंग सभगृहात दिनांक तीन रोज मंगळवारला निपाण प्रकल्पग्रस्तांची बैठक पार पडली. यावेळी माजी आमदार तथा शेतकरी नेते ऍड वामनराव चटप, एडवोकेट दीपक चटप, सुधीर सातपुते, बंडू भादेकर, चेतन गुंडावर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी प्रकल्पग्रस्तांनी बैठकीत आपल्या समस्या मांडल्या व आजवरच्या प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला लोकप्रतिनिधींचे सहकार्य न मिळाल्याची खंत व्यक्त केली. बैठकीचे संचालन लिमेश माणूसमारे यांनी तर प्रास्ताविक संघटक मधुकर सावनकर यांनी केले.बैठकीला यशस्वी करण्यासाठी तेजकरण बदखल, सुरेश बदखल, बापूराव सोयाम, देवराव खापने, अनुप खुटेमाटे, नाणेभाई माथनकर, रवी बोडेकर, शामराव चेंदे, संदीप खुटे माटे, मनोहर खापणे,अशपाक भाई, बबन डोये आदिंनी सहकार्य केले.
0 टिप्पण्या