हाळी-हंडरगुळी येथील प्रकार
हंडरगुळीत एक घर केले सील
ग्रामपंचायतने दिले नाही प्रमाणपञ संबंधित बॅंक किंवा फायनान्सने ४२० ची फिर्याद द्यावी,ग्रामपंचायत चौकशीला तयार,ग्रा.वि.अ.कांबळे
चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-आजच्या विज्ञान,तंञज्ञानाच्या चालू जमान्यात अनेक 'टॅलेंन्टेड' माणसं चंञावर गेली व आली.तसेच विज्ञान व मोबाईलच्या या युगात जग जवळ आले तसे अनेकांना मोठी 'हाव' पण सुटल्याने अनेकांच्या आशा,अपेक्षा व आकांक्षा आकाशाला धरु पाहत आहेत.तसेच अनेकजण'झट की पट' गर्भश्रीमंत होण्याचे स्वप्न बघू लागले. आणि याच स्वप्न्नापायी,मोहापायी गल्ली ते दिल्ली दरम्यानच्या खाजगी व सरकारी यंञणेला 'उल्लू' बनवून लखपती झाल्याचा आणि या 'उल्लू' बनवण्याच्या नादात एकाच्या राहत्या बंगल्याला संबंधित यंञणेने 'सील' केल्याचा प्रकार हंडरगुळी ता.उदगीर येथे दि.५ मे रोजी उघडकीला आला आहे.तर हाळी येथील कांही घरांना ही येत्या कांही दिवसात 'सील' करण्याची चर्चा आहे.
कारण,हाळी येथे पण बनवाट गावठाण व आठ अ द्वारे अनेकांनी मिळून संबंधित बॅंक व फायनान्सचे करोडो रुपयांचे लोन उचलले असून एका इसमाच्या नावे पन्नास लाख उचलल्याचे आणि त्या इसमाने गावातील कांही प्रतिष्ठांना घेऊन चौकी गाठली आणि पोलीसांशी या बाबत सल्लामसलत केली आहे.
तेंव्हा हंडरगुळीत एका घराला सील केले तसे हाळीत किती घरांना सील केले जाणार?तसेच या बनवाबनवी च्या फंद्यात कोण,कोण अडकणार? याकडे हाळीकरांचे लक्ष लागले आहे
कारण,"झट्ट मंगनी,पट्ट शादी" या ऐवजी आजकाल अनेकजण 'झट्ट की पट्ट' लखपती बनण्याचे 'ड्रीम' बघत असतात.आणि हात,पाय हे न मळता लखपती बनण्यासाठी काय पण करायला एका पायावर व एका शब्दावर तयार होत असल्याचे तसेच एखाद्याला दिलेली रक्कम ते ही व्याजी दिलेली रक्कम व्याजासह वसुल करण्यासाठी तो सावकार व्याजी रक्कम घेतलेल्या इसमाला ज्याला 'सुपा' इतकी ना शेती आहे, ना कोणता 'बिझनेस' अशा इसमाला पुढे करुन तसेच ग्रामपंचायत मधील एखाद्या नोकरदारास ५ दहा हजार व एखादी 'पार्टी-शाॅर्टी' देऊन बनावट सही,शिक्क्याचे घर नमुना नं.८ अ तसेच गावठाण प्रमाणपञ काढूण घेतो.आणि होमलोन,बिझनेस लोन देणा-या बॅंका व फायनांन्सच्या कांही लालची नोकरदारास लोनची मंजूर रक्कम किती.यावर आधारित कांही प्रमाणात 'टक्केवारी' देतो.व ते लोन उचलतो.आणि ही सगळी "बनवाबनवी-फसवाफसवी" करत असताना ज्याच्याकडे राहायला धड घर नाही,ना कोणता बिझनेस,ना पसाभर जमीन.अशा इसमाला तो अवैध सावकारी करणारा व्यक्ती नातेवाईकाच्या बंगल्यापुढे शानदार फोटो काढून तो बंगला "माॅडीफाय" करुन देतो.तसेच स्वखुशीने आपल्या स्वत:च्या दुकानाचे नामफलक बदलून त्या इसमाच्या नावाचे फलक लावुन देतो.आणि कोणताही बिझनेस नसलेल्या त्या व्यक्ती च्या नावावर 'बिझनेस लोन' उचलून घेतो घेतल्याचा प्रकार हंडरगुळी येथे पाच मे रोजी 'त्या' बंगल्याला लोन दिले त्या संस्थेच्या यंञणेनी पोलिसांच्या बंदोबस्तात 'सील' ठोकले तेंव्हा हा सगळा बनवाबनवी,फसवाफसवीचा प्रकार उघडकीस आला आहे.
कारण,ज्याला व्याजी रक्कम दिली होती,त्या अवैध खाजगी सावकाराने व्याची दिलेली ती रक्कम वसूल करण्यापायी हा बनवाबनवी आणि फसवाफसवीचा वापरलेला "फंडा" त्याच्याच अंगलट आला आहे.कारण ज्याला पुढे करुन बिझनेस लोन उचलले त्या व्यक्तीने मुदतीत हप्ते भरले नसल्यामुळे तो बंगला सील करण्यात आला असल्याचे समजते. हे जरी सत्य असलेतरीही कुलूप सील केलेल्या त्या बंगल्याचे चर्तु:सिमेसह गाव नमुना नं.आठ,अ तसेच गावठाण दिले कोण? तसेच ज्याच्या नावावर बिझनेस लोन दिले त्या व्यक्तीची कसलीही शहानिशा न करता लाखो रुपयांचे बिझनेस लोन मंजुर व्हावे,या करीता जीवतोड धडपड करणारा हंडरगुळीतील तो इसम कोण?तसेच अशा प्रकारे आठ अ व गावठाणचे प्रमाणपञ आणखी कुणा,कुणाला दिले व त्यात कितीची 'डील' झाली? या सारखे प्रश्न सजग नागरीकातून संबंधित यंञणेला विचारले जात आहेत.
*ज्या बंगल्याला सील ठोकले आहे, त्या बंगल्याचे नमुना नं.८अ आणि गावठाण प्रमाणपञ हे मी दिलेलो नाही.ते बनावट सही शिक्के करुन दिलेले आहे.याची तसेच बनवाबनवी करुन बनावट कागदपञ काढणारे व संबंधित बॅंक तथा फायनांन्सला ठगवणारे महाठग कोण,कोण आहेत याची चौकशी करुन संबंधित बॅंक अथवा फायनान्सने रितसर ४२० ची तक्रार दाखल करावी,आम्ही चौकशीला तयार आहोत,अशी माहिती हंडरगुळीचे ग्रामपंचायत अधिकारी एस.आर.कांबळे यांनी दिली आहे*
0 टिप्पण्या