Ticker

6/recent/ticker-posts

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा शहीद मुरली नाईक यांच्या कुटुंबियांशी फोनवर संवाद!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
मुंबई – वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काल रात्री भारत सैन्यातील शहीद जवान मुरली नाईक यांचे वडील श्रीराम नाईक यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. शहीद मुरली नाईक यांचे कुटुंब सध्या कामराज नगर, घाटकोपर (मुंबई) येथे वास्तव्यास आहे.

भारत - पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात जवान मुरली नाईक शहिद झाले होते. अग्निवीर म्हणून ते सैन्यात दाखल झाले होते. 

सरकारकडून कुठलीही मदत मिळत नसल्याची खंत नाईक कुटुंबीयांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे व्यक्त केली. अॅड. आंबेडकर यांनी नाईक कुटुंबियांना आश्वस्त केले की, मी लवकरच मुंबईत येऊन शहीद मुरली नाईक यांच्या कुटुंबीयांची भेट घेईन आणि त्यांची व्यथा सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घेईन. यावेळी अॅड. आंबेडकर यांनी तीव्र दुःख व्यक्त केले की, आजपर्यंत सरकारकडून शहीद मुरली नाईक यांच्या कुटुंबाला कोणतीही मदत मिळालेली नाही. या संदर्भातील माहिती ट्विट करून त्यांनी दिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या