Ticker

6/recent/ticker-posts

पांगरीतील विश्वशांती बौद्ध स्तूप परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण; HWPL व नालंदा स्तूप ट्रस्टचा उपक्रम

चित्रा न्युज प्रतिनिधी 
पांगरी  : पांगरी येथील विश्वशांती बौद्ध स्तूप परिसरात ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून HWPL या जागतिक संस्थेच्या व नालंदा स्तूप बुद्धीजम अ‍ॅण्ड रिसर्च ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत नारळ, आंबा, चिक्कू, सिताफळ अशा विविध प्रकारच्या एकूण ३६ फळझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन पांगरी गावाचे मा. सरपंच शहाजी धस, उपसरपंच धनंजय खवले, माजी उपसरपंच ॲड. रियाज बागवान, सामाजिक कार्यकर्ते विलास गोडसे, निळकंठ शेळके, सचिन पालके, नाना चांदणे, अलामिन शेख, पत्रकार बाबा शिंदे, अनिल खुने, उद्योजक शितलकुमार जानराव आणि रवि माळी या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमात नालंदा स्तूप बुद्धीजम अ‍ॅण्ड रिसर्च ट्रस्टचे अध्यक्ष सत्यजित जानराव यांनी HWPL (Heavenly Culture, World Peace, Restoration of Light) या जागतिक संघटनेची सविस्तर ओळख उपस्थितांना करून दिली. त्यांनी सांगितले की, HWPL ही संस्था जगभरात शांततेसाठी कार्यरत असून, पर्यावरण संवर्धन, धार्मिक समन्वय आणि मानवतेचा संदेश पसरविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करते.

कार्यक्रमात पुढे पांगरी गावाचे सरपंच शहाजी धस व उपसरपंच धनंजय खवले यांना HWPL या जागतिक संस्थेच्या वतीने "पिस एज्युकेशन व शांतता प्रस्ताव" प्रदान करण्यात आले. पांगरी या गावाची ओळख ग्लोबल व्हिलेज म्हणून निर्माण व्हावी यासाठी या प्रस्तावाचे विशेष महत्त्व आहे.

मा. सरपंच शहाजी धस व माजी उपसरपंच ॲड. रियाज बागवान यांनी या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करत सांगितले की, वृक्षारोपण हा केवळ पर्यावरण रक्षणाचा नव्हे, तर भावी पिढ्यांना शुद्ध हवामान, अन्न आणि आरोग्यदायी जीवन देण्याचा एक सकारात्मक उपक्रम आहे. यासारखे कार्यक्रम समाजात धार्मिक सौहार्द, शांतता, आणि एकात्मतेचा संदेश देतात.

या कार्यक्रमाला विश्वास वाघमारे, कैमुद्दीन काझी, अक्षय साळवे, जमीर शेख, सोमनाथ खुने, प्रसेनजित जानराव, माने, भिमा जानराव आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

हा कार्यक्रम पांगरी गावासाठी ऐतिहासिक ठरला असून, पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने उचललेले हे पाऊल संपूर्ण जिल्ह्यासाठी आदर्श ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या