Ticker

6/recent/ticker-posts

ज्येष्ठ नागरिकांनी लुटला ताडोबा व्याघ्र जंगल सफारी चा मनमुराद आनंद



चित्रा न्युज प्रतिनिधी 
 भंडारा:- येथील ज्येष्ठ नागरिक,पतंजली योग समिती छत्रपती संभाजी उद्यान(मिस्कीन गार्डन) च्या योग साधकांनी नुकतेच रुपेश टांगले यांच्या सौजन्याने ताडोबा व्याघ्र जंगल सफारी चा मनमुराद आनंद लुटला.भंडारा येथून सकाळी ८.३० वा २०_ २५ ज्येष्ठ नागरिक व योग साधकानी ५ गाड्यातून ताडोबा करिता प्रस्थान केले. दवडीपार दर्ग्याजवळ काही वेळ थांबून पुढे नीलज फाट्यावर चहा घेतला आणि व्हाया कांपा _टेंपा वरून आजूबाजूच्या वन सौंदर्याचा आस्वाद घेत ११.३० वा च्या सुमारास ताडोबा येथील टायगर_एम्पायर रिसॉर्ट ला पोहोचले.तिथे दुपारचे जेवण आटोपून काही वेळ विश्रांती घेत दुपारी ३.०० वा कोलारा गेट वरून ५ जीपस्या गाड्यांनी  व्याघ्र _ व जंगल सफारी करिता प्रयाण केले. काही अंतरावर येथे पाण्याच्या डबक्यात भला मोठा झायलो नावाचा वाघ समोर बसलेला दिसला .पश्चात सर्व जिपस्या गाड्या इथे येवून थांबल्या . एक तासानंतर तो पाण्याच्या बाहेर यवून जंगलात निघून गेला.
४० की.मी.चा जंगल पिंजून काढला.मध्यंतरी पावसाच्या सरी व ढगाळ मुळे एक निसर्ग रमणीय,सुंदर वातावरणाची छटा बघायला मिळाली.
तलाव परिसरात प्रसिद्ध वाघीण जुनाबाई आपल्या पिलां सोबत समोर येतांना दिसली,दर्शन घेत सर्व अवाक झाले.हे एक नशीबच म्हणावे लागेल  की पावसाळ्यात हिरव्यागार रानावनात ही व्याघ्र दर्शन घेत सर्वजण सुखावले. या दरम्यान भालू, बार्किंग _डियर,नीलगाय, जंगली_कोंबडा,मोर_,लांडोर,घोरपड,नेवला सह अनेक पशु _पक्षी  ही आढळले.४ तास जंगलातून फेरफटका मारत सुखरूप पणे आपल्या रिसॉर्ट ला पोहोचून स्विमिंग टैंक मध्य काहींनी स्नानाचा आनंद घेतला व रात्री ला सर्वांनी जेवण केले.एकंदरीत सर्वांनी मनसोक्तपणे खूप आनंद लुटला.रात्री विश्राम नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी चहा_नाश्ता करून आपल्या गंतव्या कडे प्रस्थान केले. या सफारी मध्ये प्रमुख मार्गदर्शक (मुख्य योग शिक्षक) शाम कुकडे,रुपेश टांगले,अतुल वर्मा, मो सईद शेख, के झेड शेंडे,चिंधूजी बुध्दे, वामन गोंधुळे, आत्माराम बेदरकर, हरिभाऊ थोटे,पुरुषोत्तम समरीत,मधुकर गभणे, पुरूषोत्तम साकूरे,संजय मोहतूरे,ललित बिसेन, विठ्ठल सेलोकर,विष्णुदास जगनाडे,मधुकर बोंद्रे,अशोक साकुरे, शामराव सार्वे, श्रीराम शिवणकर,प्रभू मडावी,वेदांत निंबार्ते,मनीष वंजारी, दिशांक मोहने ई ज्येष्ठ नागरिक व योग साधकांचा समावेश होता.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या