धडगांव पोलिसांनी फिर्यादीकडून ४३ हजार रूपये घेतले,उर्वरित २० हजार रूपये बाकी म्हणून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ!
चित्रा न्युज प्रतिनिधी
धडगांव : भरत खेमा तडवी राहणार बिजरी याचा ४ वर्षापूर्वी खून झाला होता.संशयित आरोपी म्हणून रूमा उत-या तडवी यास पोलिसांनी अटक केली होती.कोर्टाने जामीन दिल्यानंतर रूमा तडवी गांवी आल्यानंतर त्याचाही खून झाला.भरत तडवी याच्या मारेक-यांची नावे फिर्यादी विलास कुशी तडवी,आनंद कुशी तडवी भाऊ व घरच्या सदस्यांना माहीत होती.मारेक-यांची नावे कोर्टात सांगू नये म्हणून संशयीत आरोपींनी विलास तडवी व संबंधित साक्षीदारांवर दबाव आणला व जीवे ठार मारण्याची धमकीही दिली.परंतू फिर्यादी विलास तडवी व साक्षीदारांनी संशयीत आरोपींचे ऐकले नाही,त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला नाही.म्हणून दिनांक १६ जून २०२५ रोजी फिर्यादी विलास तडवी यांचे घरावर पेट्रोल टाकून घर पेटवून दिले.आगीत घर जळून खाक झाले,रोख रक्कम ७० हजार रूपये,कपडे लत्ते, भांडी, संसार उपयोगी घरगुती साहित्य जळून खाक झाले.बैल,गाय इत्यादी जनावरांसही जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
सदर घटनेची फिर्याद दाखल करून घेण्यासाठी पोलीस ठाणे धडगांव येथील संबंधित पोलिसांनी फिर्यादीकडून तब्बल ६३ हजार रूपये मागणी केली.फिर्यादीने ४३ हजार रूपये इकडून तिकडून जमवून पोलिसांना दिले.उर्वरित रक्कम नंतर देण्याचे ठरले.४३ हजार रूपये घेऊनही पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केला नाही. संशयीत आरोपी दमण्या रेदा तडवी,गणपत सामा तडवी,शिवाजी सामा तडवी,अभेसिंग दमण्या तडवी,सिंगा सामा तडवी,उषा आमश्या तडवी,राज्या रूमा तडवी सर्व राहणार बिजरी एकूण ७
आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात यावा,अशी लेखी फिर्याद विलास कुशी तडवी यांनी पोलीस अधीक्षक नंदूरबार यांच्याकडे दिली आहे.पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे धडगांव व बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांना माहितीसाठी तक्रार प्रत पाठवली आहे.
0 टिप्पण्या