चित्रा न्युज प्रतिनिधी
मुंबई - वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज शहीद जवान मुरली नाईक यांच्या कुटुंबियांची कामराज नगर, घाटकोपर (मुंबई) येथे भेट घेतली. याआधी दोन दिवसांपूर्वी त्यांनी फोनवरून नाईक कुटुंबीयांशी संवाद साधला होता.
या भेटीदरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी शहीद मुरली नाईक यांना आदरांजली अर्पण केली आणि त्यांच्या आई-वडिलांचे सांत्वन केले.
भेटीदरम्यान नाईक कुटुंबियांना कोणतीही शासकीय मदत मिळालेली नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. कुटुंबियांनी काही मागण्या मांडल्या असून, त्या संदर्भात लवकरच राज्य सरकारशी चर्चा करून आवश्यक ती मदत मिळवून देण्याचा आश्वासन आंबेडकर यांनी दिले.
------
0 टिप्पण्या