चित्रा न्युज प्रतिनिधी
शहादा :-महाविद्यालयातील इयत्ता ११ वी ची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन पद्धतीने राबवावी,ऑफलाईन प्रवेश अर्ज स्वीकारण्यात यावेत.अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून उपविभागीय अधिकारी शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,कार्याध्यक्ष बिरबल पावरा,नाशिक विभागीय उपाध्यक्ष धनायुष भंडारी,गोविंद पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
नंदुरबार जिल्ह्य़ातील महाविद्यालयात इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाची दिनांक ८ जून २०२५ पर्यंत शेवटची मुदत आहे.या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत मोबाईलच्या संपर्क क्रमांक असेल तरच प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाते. ब-याच विद्यार्थ्यांवर मोबाईल नाहीत, स्वतःचे सीम कार्ड नाही.त्यामुळे प्रवेशापासून वंचित राहत आहेत.तसेच एका विद्यार्थ्यांस एकाच महाविद्यालयात प्रवेश अर्ज दाखल करता येते.त्यामुळे अर्ज केलेल्या महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्यास विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते.म्हणून अन्य महाविद्यालयात सुद्धा प्रवेश अर्ज करण्यास मुभा असावी.नंदूरबार जिल्हा हा आदिवासी बहूल जिल्हा आहे.येथील ब-याच पालक व विद्यार्थांकडे मोबाईल नाही.म्हणून महाविद्यालयातील इयत्ता ११ वी ची प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात यावी किंवा ऑफलाईन प्रवेश अर्ज स्वीकारण्यात यावेत.अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून उपविभागीय अधिकारी शहादा यांच्याकडे करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या