Ticker

अक्कलकुव्यात "चोर आला" म्हणत आदिवासी संघटनांनी दाखवले काळे झेंडे!

आदिवासी संघटनांना घाबरून चंद्रकांत रघुवंशी यांची कार्यक्रमास दांडी!

चित्रा न्युज प्रतिनिधी
अक्कलकुवा  :- अक्कलकुव्यात चोर आला,भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी चले जाओ अशा जोरदार घोषणा देत ३ जून २०२५ रोजी महाकाली मंदीर प्रांगण सोरापाडा अक्कलकुवा येथील भांडी वाटप कार्यक्रमासमोर आदिवासी संघटनांनी शिवसेना शिंदे गटाचे विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांचा जोरदार विरोध दर्शविला. महाराष्ट्र सरकार बांधकाम कामगार भांडी वाटप योजना अंतर्गत सोरापाडा अक्कलकुवा येथे ३ जून २०२५ रोजी   भांडे संच वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला शिवसेना शिंदे गटाचे विधानपरिषद सदस्य चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी येणार आहेत. हे समजल्यानंतर आदिवासी संघटनांनी आदल्या दिवशीच २ जून २०२५ रोजी  चंद्रकांत रघुवंशी यांना काळे झेंडे दाखवून विरोध करणार असल्याबाबतचे  पत्र अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना दिले होते. त्यानुसार कार्यक्रम स्थळी भारतीय स्वाभीमान संघाचे प्रदेश महासचिव रोहीदास वळवी,जिल्हाध्यक्ष पंकज वळवी,नंदूरबार तालुकाध्यक्ष अजय वळवी,भारत आदिवासी संविधान सेनेचे कार्याध्यक्ष रवींद्र वळवी,प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे,शहादा तालुका कार्यकर्ता सुनिल पवार, बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा,सामाजिक कार्यकर्ता योगेश गावीत ,समाजसेवक निलेश पाडवी आदि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी चलो जाओ अशा जोरदार घोषणा देत काळे झेंडे दाखवत जोरदार विरोध दर्शवला.आदिवासी संघटनांचे आक्रमक रूप बघून घाबरून चंद्रकांत रघुवंशी या कार्यक्रमाला आलेच नाही,त्यामुळे अनर्थ टळला.
                    भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी यांनी आपल्या राजकीय पदाचा गैरवापर करून नंदूरबार जिल्ह्य़ातील आदिवासी बांधवांच्या हजारो एकर जमिनी बेकायदेशीर, अवैद्य, बोगस ,फेरफार करून हडप केल्या आहेत.आदिवासींच्या जमिनी परत मिळाव्यात, म्हणून आमच्या आदिवासी संघटनांचा कायदेशीर लढा सुरू आहे.चंद्रकांत रघुवंशी यांनी शहादा येथील शिवसेना शिंदेगटाच्या कार्यक्रमात आदिवासी संघटना ह्या तीनपाट आहेत, अशी शिवीगाळ करून संपूर्ण आदिवासी समाजाला अपमानित करण्याचे,तुच्छ लेखण्याचे काम केले,म्हणून आदिवासी समाजात चंद्रकांत रघुवंशीविरोधात तीव्र संताप आहे,राग निर्माण झाला आहे.नंदूरबार जिल्ह्य़ातील अक्कलकुवा, शहादा,नवापूर व नंदूरबार हे ४ मतदार संघ आदिवासींसाठी राखीव असतांना यापैकी शहादा व नंदुरबार हे २ विधानसभाक्षेत्र खुले मतदारसंघ करण्याची चंद्रकांत रघुवंशी मागणी करत आहेत,म्हणून आम्ही शहादा येथे चंद्रकांत रघुवंशी यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला.
                         भांडे संच वाटप कार्यक्रमास आमचा विरोध नाही,या कार्यक्रमात येणा-या अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघाचे आदिवासी आमदार आमश्या पाडवी यांचाही विरोध नाही परंतू ज्यांनी आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीर हडप केल्याय, जे वारंवार आदिवासींच्या विरोधीत बोलतात,त्या चंद्रकांत रघुवंशीचा विरोध आहे. आम्ही आमच्या आदिवासी स्टाईल ने आज चंद्रकांत रघुवंशी यांचा काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करत आहोत. चंद्रकांत रघुवंशी जिथे जिथे कार्यक्रमास जातील तिथे आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवून विरोध दर्शणार आहोत. भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी चलो जाओ,अशा जोरदार घोषणा देत बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या