चित्रा न्युज प्रतिनिधी
पुणे :-पुनावळे येथील गायकवाड नगगरातील मुख्य रस्त्याचे प्रलंबित डांबरीकरणाचे विधिवत भूमिपूजन मिलेनियम सोसायटीचे मालक व तरुण समाजसेवक अमितभाऊ दर्शले यांचे आग्रहाखातर यां क्षेत्राचे तडफदार नेते मा. राहुलजी कलाटे यांच्या हस्ते काल 2 जून रोजी सकाळी 11 वाजता मिलेनियम सोसायटी समोर करण्यात आले.
या प्रसंगी परिसरातील जी. के. रोज अस्टर सोसायटीचे सन्मानीय चेयरमन मच्छिन्द्र मोहाते व सोसायटीचे ज्येष्ठ नागरिक संघांचे पत्रकार अशोक वस्तानी, सतीश भालेराव, बबन पाटील, विनायक हुगेवार तसेच या परिसरातील सन्माननीय नेते अतुलभाऊ ढवळे, तुषार बोडके, निलेशभाऊ ढवळे, नितीनभाऊ दर्शले, अजिक्यभाऊ गायकवाड, गणेश दर्शले, माऊली कुदळे, अविनाश चालके, सागर बोरगे यांनी नारळ फोडून उत्तम अशा दर्जाच्या या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
मा. राहुलभाऊ कलाटे यांच्या सह मा. अमितभाऊ दर्शले यांनी रोज अस्टर सोसायटीच्या ज्येष्ठ नागरिकांना या भूमिपूजनाच्या कार्यात सहभागी करून घेतल्या बद्दल नागरिकांनी राहुलभाऊ व अमितभाऊंचे आभार व्यक्त केले.
भूमिपूजन स्मारभंनतर उपस्थितांना अमितभाऊ दर्शले यांच्या मिलेनियम सोसायटीतील वातानुकुलीत दालनात पाचारण करण्यात. तेथे मा. राहुल भाऊंचे बुके देऊन त्यांचे मित्रमंडळ व रोज अस्टर सोसायटीच्या ज्येष्ठ नागरिकांनी स्वागत करून विकास कामाबाबत आभार व्यक्त केले.
या प्रसंगी गायकवाड नगरातील जनसमस्या प्रशासनाच्या माध्यमाने सोडविण्याचे आश्वासन मा. राहुलभाऊंनी उपस्थितांना दिले.
0 टिप्पण्या