सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615
जामखेड :- जामखेड खर्डा रोड येथे सामाजिक कार्यकर्ते वसीम भाई बिल्डर यांच्या वतीने खर्डा चौक रेस्ट हाऊस येथे रक्तदान शिबिराचे केले आयोजन वसिमभाई बिल्डर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 145 रक्तदात्यांनी केले रक्तदान
सामाजिक कार्यकर्ते वसिमभाई बिल्डर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. आजच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप तसेच भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी सुमारे 145 रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी बोलताना विविध मान्यवरांनी सांगितले की, वसिमभाई बिल्डर हे नेहमीच सामाजिक सलोख्यासाठी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असतात. समाजात सामाजिक एकोपा कसा राहिल यासाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.आज सकाळी उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व मिठाई वाटप करण्यात आले. तसेच वसिमभाई बिल्डर मित्रमंडळ व जनकल्याण रक्तकेंद्र नगर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सुमारे 145 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले म्हणाले की, वसीमभाई बिल्डर यांचा वाढदिवस दरवर्षी आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करत असतात. नेहमीच जातीय सलोखा व सामाजिक सलोखा राखण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. यावर्षी रक्तदान शिबीर व शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले आहे.यावेळी बोलताना अन्सार पठाण म्हणाले की, सामाजिक कार्यकर्ते विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करतात. गरीब लोकांना मदत करण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असतात.यावेळी विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले,जामखेड तालुका डॉक्टर असोसिएशनचे डॉ सादेक पठाण, डॉ. प्रशांत गायकवाड, डॉ. प्रदिप कुडके, डॉ. फारूक शेख, डॉ. विकी दळवी, उमर कुरेशी तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष, जमीरभाई सय्यद, मोहसिन कुरेशी, हाजी अस्लम शेख, जमीर शेख, फारूक कुरेशी, नजीर कुरेशी, तय्यब सय्यद, सलमान सय्यद, वसीम कुरेशी व वसीमभाई(बिल्डर) मित्र मंडळ या सह अनेक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या