सैनिक समाज पार्टीचे आरोग्य उपसंचालक यांचेसह सचिवांना पत्र.
जिल्हा परिषद आरोग्य प्रशासन योग्य कारवाई करणार का❓
चित्रा न्युज प्रतिनिधी
नागपूर :-आरमोरी तालुक्यातील भाकरोंडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कुरंडीमाल येथील आरोग्य पथकातील कारभाराची माहिती वृत्तपत्र आणि न्युज पोर्टलवर प्रकाशित झाल्यानंतर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन संबंधितांवर रितसर कारवाई करावी अशी मागणी सैनिक समाज पार्टीचे वतीने आरोग्य विभागाचे उपसंचालक नागपूर विभाग नागपूर, संचालक आरोग्य सेवा संचालनालय आरोग्य भवन मुंबई, आरोग्य मंत्री, जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. या प्राथमिक आरोग्य पथकातील आरोग्य सेवा कर्मचाऱ्या अभावी खिळखिळी झाली आहे. डॉक्टरांच्या कमतरतेमुळे फार्मासिस्ट आणि चतुर्थश्रेणीचे कर्मचारी रुग्णांवर उपचार करतात ही फार गंभीर बाब आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कर्मचाऱ्या अभावी आणि आरोग्य सुविधांची कमतरता असल्याने जनतेला चांगली आरोग्यसेवा मिळत नाही. चांगली आरोग्य सेवा मिळविण्यासाठी खूप दूरवर जावे लागते.
जिल्ह्यात अनेक दुर्गम आणि आदिवासी वाड्या-वस्त्या आहेत, जिथे आरोग्य केंद्रांची संख्या कमी आहे.आरोग्य कर्मचारी नाहीत. असले तरी अनेक ठिकाणी डॉक्टरांचे मुख्यालयी राहाणे होत नाही. त्यामुळे, लोकांना आरोग्यसेवा देण्याचे काम फार्मासिस्ट, कंपाऊंडर आणि नर्सेस व अन्य कर्मचारी करून आपले कर्तव्य बजावत आहेत.
जिल्ह्यातील अनेक आरोग्य केंद्रांमध्ये पुरेसे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी नाहीत, त्यामुळे आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे.
काही ठिकाणी जनतेला आवश्यक असलेल्या आरोग्य सुविधा, जसे की ॲम्बुलन्स, व्हेंटिलेटर आणि इतर आवश्यक उपकरणे उपलब्ध नाहीत, ज्यामुळे आरोग्य सेवांचा दर्जा खालावला आहे. अनेक सरकारी आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यामुळे, लोकांना त्याचा पुरेपूर लाभ मिळत नाही,
जिल्ह्यातील गरिबी आणि कुपोषणाचे प्रमाण जास्त असल्यामुळे, लोकांना आरोग्य सेवांची जास्त गरज आहे, पण ती मिळत नाही.
एकंदरीत, गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी शासन प्रशासकीय अधिकारी यांनी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
यासाठी सरकारने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कुरंडीमाल येथील प्राथमिक आरोग्य पथकातील मुख्यालयी न राहाणाऱ्या त्या डॉक्टरची जिल्हा परिषद आरोग्य प्रशासनाने बदली करावी, अशी मागणी सैनिक समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲड. शिवाजी डमाळे यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
0 टिप्पण्या