Ticker

6/recent/ticker-posts

मनपा आयुक्तांच्या संकल्पनेतून महापालिका अधिकारी व कर्मचारी यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार


विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज 

नांदेड:- सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून महापालिकेच्या कामकाजास नवि दिशा देऊ पाहणाऱ्या *मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे* यांच्या संकल्पनेतून महापालिकेतील कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी *गुणवंत पाल्यांचा सत्कार सोहळा* दिनांक ०७ जुलै २०२५ रोजी महापालिकेत कै.शंकरराव चव्हाण सभागृह येथे पार पडला. यंदा या कार्यक्रमाचे हे *दुसरे वर्ष* होते. या कार्यक्रमास *अध्यक्ष म्हणून पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार* तर *प्रमुख अतिथी म्हणून मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे* यांची उपस्थिती होती.

मागील वर्षी महापालिकेचा वार्षिक अर्थसंकल्प सादर करताना महापालिकेतील कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्या पाल्यांना शिक्षणाच्या दृष्टिकोनातून प्रोत्साहित करण्यासाठी गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्याचा मानस आयुक्तांनी व्यक्त केला होता. या वर्षी सुध्दा अर्थसंकल्पात तरतुद करुन इयत्ता दहावी व बारावी मध्ये ७५% पेक्षा विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या गुणवंत पाल्यास इयत्ता दहावीतील २९ विद्यार्थानां प्रत्येकी रु.११,०००/- व इयत्ता बारावीतील ०७ गुणवंत पाल्यांना प्रत्येकी रु.२१,०००/- चा धनादेश, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

दहावी व बारावीचे विद्यार्थी पालकांसह या कार्यक्रमास उपस्थित झाले होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना मान्यवरांनी त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या मुलांनी कठोर परिश्रम करुन यश प्राप्त केले आहे. मात्र खरी परीक्षा पुढे आहे. परीक्षेत गुण मिळणे महत्वाचे आहे. पण त्यापेक्षा या गुणांचा जीवनाच्या वाटचालीत कसा उपयोग करता हे त्यापेक्षा महत्वाचे आहे. त्यामुळे मुलांनी पुढच्या वाटचालीसाठी तयार राहावे, असे आवाहन मान्यवरांनी केले.

याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात पोलीस अधिक्षक अविनाश कुमार यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून अशा प्रकारच्या सत्कार सोहळ्यामुळे या सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांचे मनोबल वाढण्यास मदत होणार असून हा कार्यक्रम त्यांच्या भावी कारकिर्दीस प्रेरणा देणारा ठरेल असे प्रतिपादन केले केले.

तसेच मनपा आयुक्तांनी आपले मनोगत व्यक्त करताना या उपक्रमातून महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या पाल्यांना शिक्षणाच्या दृष्टिकोनातून प्रोत्साहन मिळावे व या सत्कार सोहळ्या पासून प्रेरणा घेऊन त्यांनी आपल्या जिवनामध्ये उंच भरारी घ्यावी. तसेच समाजामध्ये वावरत असताना एक सुजाण नागरिक होऊन आपली स्वतःची कारकीर्द घडवण्याबरोबरच उच्चपदस्थ जाऊन या संस्थेचे त्याचबरोबर आपल्या आई-वडिलांचे नावलौकिक करावे असे आवाहन गुणवंतांना यावेळी आयुक्तांनी केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपआयुक्त सुप्रिया टवलारे यांनी केले तर सुत्रसंचलन संतोष देवराय यांनी केले. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक आयुक्त प्रशासन गुलाम मो.सादेक, कार्यालय अधिक्षक पदमाकर कावळे, कल्याण घंटेवाड, प्रधाण धम्मपाल, शुभांगी चौघरी, श्रध्दा बुरसे, श्रीरंग पवळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

*चौकट :-*

*यांचा झाला गौरव :-*
*बारावीतील गुणवंत* : वैष्णवी देविदास जोशी (८७.६७%), ग्यानेश्वर रमेश चवरे (८०.००%), श्रृती संजय शिंदे (८०.००%), संकर्षण शरदचंद्र साहू (७९.६७%), रिमा सुनिल वाघमारे (७७.८३%), अनिकेत संतोष काळे (७७.८३%), साक्षी दिनेश बागडे (७७.१७%)
*दहावीतील गुणवंत* :- मधुरा रमेश चवरे (९६.००%), धनराज दिगांबर कदम (९६.००%), अरिहंत गिरीश कदम (९५.२०%), आर्या प्रदिप कावलगुडेकर (९५.२०%), अदिती साहेब जोंधळे (९४.६०%), आयान फरहतउल्ला बेग (९२.२०%), साईप्रसाद संदीप तुप्पेकर (९०.८०%), प्राप्ती विजय शर्मा (९०.६०%), कुंदन राजु सोनकांबळे (९०.२०%), शिवकुमार मालु यनफळे (८९.४०%), रोहित अनिल भाग्यवंत (८९.२०%), भक्ती संदिप धोंगडे (८९.२०%), रुषिकेश अनिरुध्द पांडे (८८.६०%), अनुषा शिवराम आष्टुरकर (८८.०२%), आदित्य शिवकुमार बिजमवार (८८.००%), सृष्टी साहेबराव ढगे (८७.६०%), कल्याणी मारोती सारंग (८७.६०%), श्रृती हेमराज वाघमारे (८४.८०%), हर्षवर्धन हनुमंत रिष्ठे (८४.२०%), गंगासागर गणेश बोधले (८३.००%), जपजोतसिंघ सतपालसिंघ कोल्हापुरे (८१.२०%), वेदांत भारत रत्नपारखे (८०.४०%), राजरत्न शिवानंद पवळे (७९.६०%), रौनित कैलास घोगरे (७८.६०%), शर्वरी प्रदीप फुलारी (७८.००%), ओमकार गणेश यलगंदवार (७७.००%), वैष्णवी संतोष जिंतुरकर (७५.८०%), आयुशसिंघ नितीनसिंघ ठाकुर (७५.६६%), प्राजक्ता प्रकाश हानवते (७४.६०%).

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या