Ticker

6/recent/ticker-posts

तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या महिला आघाडीच्या वतिने जोपासली सामाजिक बाधिलकी..

चित्रा न्युज प्रतिनिधी 
पुणे-  तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदिपभाऊ गवई यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडीच्या वतिने वाडे बोलाई वाघोली येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मनीषा प्रदीप सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली माऊली अनाथ बालक आश्रम मध्ये 50 मुलांना साफ सफाई चे सामान आणि स्नॅक्स वाटप व वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या कार्या विषयी, जिवन दिप आनाथ आश्रम व वृध्दाश्रम च्या कार्याविषयी माहिती दिली व आशा विविध कार्या संबंधित माहिती देत आशेच उपक्रम राबविण्यात येतील आसे सांगितले..
यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मनीषा प्रदीप सोनवणे, बालक अश्रम संस्था अध्यक्ष गोदावरी बसवराज द्याडे,ऍड.चेतना सोनवणे, सीमा भडकवाड, स्वाती बेंगले, रेश्मा शिंदे, संतोष नागोडे आदी समस्त तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या