उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांनी चौकशी दडपून ठेवली- सुशिलकुमार पावरा
चित्रा न्युज प्रतिनिधी
शहादा : खैरवे-भडगांव येथील पुरूष व महिला ग्रामस्थांना वाईट वाईट शिवीगाळ करून बेदम मारहाण करून ,सार्वजनिक ठिकाणी अपमानित करून, अत्याचार करून गांवाची शांतता,कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करणा-या वादग्रस्त पोलीस पाटील श्री.धनराज उत्तम पानपाटील यांना तात्काळ पदावरून हटवा व त्यांच्या जागी अन्य सन्माननीय व विश्वसनीय व्यक्तीची पोलीस पाटील पदावर नेमणूक करा,या मागणीसाठी आदिवासी संघटना जिल्हा नंदूरबार चे दिनांक ८ जुलै २०२५ रोजी सकाळी ११. वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय शहादा समोर ठिय्या आंदोलन होणार आहे.आदिवासी संघटनांकडून ठिय्या आंदोलनाचे निवेदन उपविभागीय अधिकारी शहादा यांना देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे, एकलव्य भिल्ल समाज मंडळ संघटनेचे अध्यक्ष तुकाराम मोरे,सुनिल भील, सुरेश भील ,जितेंद्र भील ,माहरू सोनवणे ,भाऊसाहेब भील ,अप्पा कुवर ,रमेश पवार, बापू पवार ,भुरेसिंग सोनवणे, सुनिल भील आदि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
खैरवे-भडगांव येथील आदिवासी पुरूष व महिला ग्रामस्थांना मारहाण करणा-या वादग्रस्त पोलीस पाटील श्री.धनराज उत्तम पानपाटील यांना पदावरून तात्काळ हटवा,अशी तक्रार खैरवे-भडगांव येथील ग्रामस्थांनी दिनांक १७ जून २०२५ रोजी उपविभागीय अधिकारी शहादा यांच्याकडे केली होती.त्यानंतर आदिवासी संघटनांनी दिनांक २४ जून २०२५ रोजी निवेदन देऊन पोलीस पाटील वर कारवाईची मागणी केली होती.सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी शहादा यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार यांना दिनांक २० जून २०२५ रोजी दिले होते.परंतू दत्ता पवार यांनी या प्रकरणाची चौकशी अद्याप केलीच नाही.तक्रारदारांना जाणीवपूर्वक जबाब नोंदवायला दत्ता पवार यांनी बोलावलेच नाही,आरोपी पोलीस पाटीलला वाचवण्याचे काम करत आहेत. चौकशी अधिकारी दत्ता पवार यांच्यावर आमचा विश्वास नाही.कारण त्यांनी आदिवासींना आजपर्यंत कोणत्याच प्रकरणात न्याय दिला नाही.खैरवे-भडगांव येथील पोलीस पाटीलला पदावरून हटवा या मागणीसाठी आम्ही दिनांक ८ जुलै २०२५ रोजी आदिवासी संघटनांतर्फे उपविभागीय अधिकारी शहादा कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार आहोत, अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.
0 टिप्पण्या