Ticker

6/recent/ticker-posts

फिर्यादीकडून ४३ हजार रूपये लाच घेणा-या पोलीस उपनिरीक्षक व ठाणे अंमलदारला निलंबित करा- बिरसा फायटर्सची मागणी


धडगांव पोलीस ठाण्यातील पोलीस रक्षक की भक्षक?

चित्रा न्युज प्रतिनिधी
शहादा :- खुन प्रकरणाच्या अनुषंगाने घर जाळल्याची फिर्याद घेण्यासाठी फिर्यादीकडून  ४३ हजार रूपये घेणा-या पोलीस ठाणे धडगांव येथील संबंधित पोलीसांची सखोल चौकशी करून तात्काळ सेवेतून निलंबित करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.धडगांव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाने ३० हजार रूपये व ठाणे अंमलदाराने १३ हजार रूपये घेतल्याची कबुली फिर्यादी विलास तडवी यांनी दिली आहे.
                   खुनाच्या गुन्ह्यात साक्ष देवू नये म्हणून धडगांव तालुक्यातील बिजरी या गांवात संशयीत आरोपींनी विलास तडवी यांचे पेट्रोल टाकून घर जाळले,या घटनेची फिर्याद दाखल करून घेण्यासाठी पोलीस ठाणे धडगांव येथील संबंधित पोलिसांनी फिर्यादीकडून तब्बल ६३ हजार रूपये मागणी केली.फिर्यादीने ४३ हजार रूपये इकडून तिकडून जमवून पोलिसांना दिले.उर्वरित २० हजार रूपये  रक्कम नंतर देण्याचे ठरले.४३ हजार रूपये घेऊनही पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केला नाही. संशयीत आरोपी दमण्या रेदा तडवी,गणपत सामा तडवी,शिवाजी सामा तडवी,अभेसिंग दमण्या तडवी,सिंगा सामा तडवी,उषा आमश्या तडवी,राज्या रूमा तडवी सर्व राहणार बिजरी एकूण ७
आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात यावा,अशी लेखी फिर्याद असलेले पत्र  बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांना माहितीसाठी दिनांक रोजी प्राप्त झाले आहे.
            फिर्यादीचे घर जळून संसार उपयोगी सर्व वस्तू आगीत खाक झालेले असतांना धडगांव पोलीस ठाण्यातील संबंधित पोलिसाने फिर्यादीकडूनच फिर्याद नोंद करण्यास ६३ हजार रूपये मागणी करणे,ही एक गंभीर व लाजीरवाणी बाब आहे.धडगांव पोलीस ठाण्यात पैसे दिल्याशिवाय सामान्य माणसांची तक्रार नोंदवलीच जात नाही,असा त्याचा अर्थ होतो.धडगांव पोलीस ठाण्याचा कारभार हा धडगांव तालुक्यातील स्थानिक पुढा-यांच्या इशाऱ्यावर चालतो,असाही आरोप करण्यात येत आहे.पुढारी सांगतील तशीच तक्रार नोंदवली जाते.पुढा-यांच्या दबावाखाली पोलीस काम करत असतील तर सामान्य गरीब जनतेला न्याय कोण देणार?धडगांव पोलिसांनी पुढा-यांचे न ऐकता कायद्यानुसार पोलीस ठाण्याचा कारभार चालवणे आवश्यक आहे.फिर्यादीकडूनच धडगांव पोलीस ठाण्यातील संबंधित पोलिसांनी पैसे घेतल्याच्या प्रकरणावरून पोलिसांवरचा जनतेचा विश्वास उडत आहे.म्हणून फिर्यादी विलास तडवी यांच्याकडून  ४३ हजार रूपये घेणा-या धडगांव पोलीस ठाण्यातील पोलिसांची सखोल चौकशी करण्यात यावी व दोषी आढळल्यास तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात यावे.अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांच्याकडे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या