Ticker

6/recent/ticker-posts

गवराळा वॉर्ड येथील पाणीपुरवठा टाकीच चक्क प्रदूषणाच्या विळख्यात



चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : जल हि जीवन है.. शुद्ध पाणी सर्व सजीवांची प्रथम मूलभूत गरज आहे. मात्र तोच पाणीपुरवठा दूषित आणि प्रदूषणाच्या विळख्यातून होत असेल तर अनेक आरोग्यविषयक समस्या तसेच पावसाच्या दिवसात मलेरिया, डायरिया, ग्रस्टो असे गंभीर परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर पडल्यास नवल नाही.
   भद्रावती नगरपरिषद मधील गवराळा वॉर्ड येथील  काही वर्षापूर्वी जलसाठा करण्यासाठी व पाणीपुरवठा होण्याकरिता  ले - आउटच्या मोकळ्या मैदानात टाकी बांधण्यात आली. मात्र या जलपुरवठा होत असलेल्या टाकी भोवती प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे कोणतीही साफसफाई, स्वच्छता करण्यात येत नाही तसेच शेजारील नालीची नियमित सफाई केली जात नाही.त्यामुळे या परिसरात प्रचंड घाण, काटेरी झुडपे , दूषित व घाणेरडा वास यामुळे जवळील रहिवाश्यांना त्रास सहन करावा लागतो आहे. गंभीर बाब म्हणजे या जलसाठ्याची कित्येक वर्षापासून साफसफाई होत नसल्याचे रहिवाशी आवर्जून सांगतात या टाकीत प्रचंड गाळ साचून पाणी पिवळसर दूषित झाल्याची ओरड होत आहे. प्रश्नाचे गांभीर्य नगर परिषदेच्या निदर्शनात आणून देण्यासाठी 
 आज.. दिनांक.७ रोज सोमवारला  नागरिकांच्या सुदृढ आरोग्यास प्रथम प्राधान्य देण्यात यावे यासाठी परिसरातील नागरिकांनी मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांना निवेदन देऊन तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली. निवेदन सादर करते वेळी, संजय वाढई , संतोष डवरे, सामाजिक कार्यकर्ते लिमेश माणूसमारे , रुपेश चिवंडे, मोरेश्वर झाडे, शंकर चिवंडे, प्रदीप शास्त्रकार, स्वप्नील शेरकी, मिनथ वाढई, राकेश बदखल आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या