Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा प. उच्च प्राथ.शाळा मांडेसर येथे शिक्षणाधिकारी यांनी दिली सदिच्छा भेट

✍️ भवन लिल्हारे उपसंपादक महाराष्ट्र राज्य मो.नं. 9373472847

भंडारा : - भंडारा जिल्हा मोहाडी तालुक्यातील केंन्द्र नेरी मौजा मांडेसर येथील जिल्हा प. उच्च प्राथ. शाळेत शिक्षणाधिकारी मा. रवींद्र सोनटक्के यांनी दिनांक ४ जुलै २०२५ रोजी शाळेला आकस्मित भेट दिली. व शाळेतील शैक्षणिक आणि प्रशासकीय कामांचा आढावा घेतला. शिक्षकांच्या अध्यापनाच्या पद्धती, विद्यार्थ्यांची प्रगती, शाळेतील सुविधा आणि इतर आवश्यक गोष्टींची तपासणी केली. तसेच, शिक्षकांना मार्गदर्शन करून शाळेच्या विकासासाठी आवश्यक सूचना दिल्या.
शिक्षणाधिकारी मा. रवींद्र जी सोनटक्के प्राथ. विभाग जिल्हा परिषद भंडारा यांचे शाळेला भेट देण्याचे मुख्य उद्देश:
शैक्षणिक गुणवत्तेची तपासणी शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आणि शिक्षकांच्या अध्यापनाच्या पद्धतीचा अभ्यास केले.शाळेतील शैक्षणिक सुविधा, जसे की वर्गखोल्या, प्रयोगशाळा, ग्रंथालय आणि क्रीडांगणे इत्यादींची तपासणी केली. त्याच बरोबर प्रशासकीय कामकाजाची तपासणी देखील केली. यामध्ये
शाळेतील नोंदी, उपस्थिती, आणि इतर प्रशासकीय कामांचा आढावा घेतला.
शिक्षकांना मार्गदर्शन करतांना
शिक्षकांना अध्यापनाच्या चांगल्या पद्धती, शैक्षणिक योजना आणि इतर आवश्यक बाबींवर मार्गदर्शन केले.
शाळेतील समस्या आणि अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. 
*शैक्षणिक गुणवत्ता:*
विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी, शिक्षकांची शिकवण्याची पद्धत आणि शैक्षणिक साहित्य.
शालेय सुविधा,वर्गखोल्या, प्रयोगशाळा, ग्रंथालय, क्रीडांगणे, पिण्याच्या पाण्याची सोय स्वच्छतागृहे,विद्यार्थ्यांची उपस्थिती, शिक्षकांची उपस्थिती, शाळेतील नोंदी, आणि इतर प्रशासकीय कामकाजाची पाहणी केली.
शिक्षकांची भूमिका देखील जाणून घेतली. यात
शिक्षकांचे योगदान, त्यांची तयारी आणि शाळेच्या विकासासाठी केलेले प्रयत्न. हे प्रशसनीय दिसून आले. 

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. भवन लिल्हारे जागरूक असल्याने शाळेची नक्कीच प्रगती होतांना दिसते आहे. समितीचे अध्यक्ष शाळेच्या विकासासाठी सक्रियपणे काम करत आहे, शाळेतील शैक्षणिक आणि भौतिक सुविधा सुधारतात. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी चांगले वातावरण निर्माण करतात.आणि शाळेचे एकूण कामकाज अधिक प्रभावीपणे चालवितात.
अध्यक्ष शाळेच्या शैक्षणिक धोरणांवर लक्ष ठेवतात, शिक्षकांना मार्गदर्शन करतात.आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहेत. अशी स्तुती केली हे. खास !

 मा. नरेंद्रजी उरकुडे केंद्रप्रमुख नेरी यांनी देखील शाळेला आकस्मिक भेट दिली.‎ यावेळी विद्यार्थी यांच्याशी हितगुज‎ करुण विद्यार्थी यांची गुणवत्ता‎ तपासली. वर्ग दुसरीतील विद्यार्थ्यांकडून  २ ते‎ २५ पर्यंत बिनचूक पाढे व गणितातील‎ शतकापर्यंत तोंडी आकडेमोड व‎ लक्षचे कोणत्याही संख्या वाचन‎ बघून केंन्द्र प्रमुख मा. नरेंन्द्र उरकुडे यांनी प्रशंसा‎ व्यक्त केली.‎ लोकसहभागातून शाळेचा‎ विकास, बाला, झेप व निपुणची‎ अंमलबजावणी बघून आनंद व्यक्त केला.

 यावेळी मा. रवींद्र सोनटक्के शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा भंडारा मा. वंजारी साहेब (उपशिक्षणाधिकारी), मा. शरद कुकडकर (गटशिक्षणाधिकारी) मोहाडी, मा. माडेमवार (शिक्षण विस्तार अधिकारी) मा. शंकर नखाते केंद्रप्रमुख मोहगावदेवी शा. व्य.समिती अध्यक्ष मा. भवन लिल्हारे , मुख्याध्यापक डी. के. माटे सर व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.

शाळेच्या‎ मुख्याध्यापक मा. डी. के. माटे सर , शा. व्य. समिती अध्यक्ष मा. भवन लिल्हारे यांनी‎ स्वागत केले. शाळेतील सर्व माहिती‎ सांगितली. व आभार शाळेचे मुख्याध्यापक मा. डी. के. माटे सर यांनी मानले. यावेळी सहाय्यक शिक्षिका धरमसारे मॅडम , भोंगाडे मॅडम , जायाभाये मॅडम , लिल्हारे मॅडम, मा. व्ही. एस. माटे सर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या