Ticker

6/recent/ticker-posts

टिळक विद्यालय येथे स्व. श्यामरावबापू कापगते यांची जयंती साजरी


 चित्रा न्युज प्रतिनिधी   
भंडारा :-टिळक विद्यालय, खंडाळा तालुका साकोली येथे जनसंघाचे प्रणेते माजी आमदार स्वर्गीय शामराव बापू कापगते यांच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यालयात छोटेखानी कार्यक्रम करण्यात आले.
           सुरुवातीला स्वर्गीय श्यामरावबापू कापगते यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण मुख्याध्यापक ए. एन. निर्वाण यांच्या हस्ते करण्यात आले तसेच प्रमुख अतिथी म्हणून पि. एन. कापगते सर, डि. डि. तुमसरे सर, ए.पी. काशिवार सर, एम. यु. मेश्राम मॅडम इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते.
        याप्रसंगी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक पि. एन. कापगते सर यांनी आपल्या मनोगतातून स्वर्गीय श्याम बापू कापगते यांच्या विविध आठवणींना उजाळा देत जनसंघ ते भाजपा आणि अन्य क्षेत्रातील पाटील साहेबांची वाटचाल, त्यांच्या राजकीय व सामाजिक जीवनाचा पाढा वाचून त्यांचे आयुष्य खऱ्या अर्थाने प्रेरणादायी असल्याचे मत पि. एन. कापगते सर यांनी व्यक्त केले.
          तसेच डि. डि. तुमसरे सर विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले, स्व. शामरावबापू यांनी आपल्या इच्छाशक्ती व व्यापक दृष्टिकोनातून समाजाच्या कल्याणासाठी स्वतःला वाहून घेतले, राजकारणाचा कोणताही वसा - वारसा पाठीशी नसताना स्वकर्तृत्वावर  लोकमानसात आपले अविस्मरणीय स्थान निर्माण केले, राजकारणात संयमी व रोखठोक कार्यपद्धती आणि आपल्या नेतृत्व शैलीने जन माणसांचे प्रश्न सोडविण्याचे सातत्याने प्रयत्न करायचे म्हणूनच आजही विदर्भातील राजकीय पुढार्‍यांशी त्यांचे अतूट नाते निर्माण झाले आहे,असे मार्मिक विचार तुमसरे सरांनी व्यक्त केले.
           कार्यक्रमाचे संचालन आर.जे. करंजेकर सर यांनी तर आभार एम.डी. मेश्राम मॅडम यांनी केले.
             कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी विद्यालयातील पी. एस. मुंगुलमारे, एन.डी. टेंभुर्णे एस. एम. मेंढे, डि. एम. रोकडे यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या