चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती :-नागरिकांनो,सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. पावसाळ्यात कीटकजन्य आजार आपली डोकी वर काढतात.कीटकजन्य आजार म्हणजे कीटकांपासून म्हणजेच डासांपासून होणारे आजार असतात.वरील डासांची अंडी स्वच्छ पाण्यात अंडी घालतात. पाण्याच्या टाक्या,हौड,माठ, टायर्स,नारळाच्या वरवंट्या, फ्रिजचा पाण्याचा ट्रे,कुलरचा ट्रे,घरात असलेले मनी प्लांट, झाडांच्या कुंड्या इत्यादी ठिकाणी डासांची अंडी तयार होतात.म्हणून जिथे डास निर्माण होतात तिथे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. आठवड्यातनं एक दिवस कोरडा पाळून घरातील सर्व पाण्याचे भांडे उपसून,घासून पुसून कोरडी करून,ऊन दाखवून भरावेत.पाण्याच्या टाक्यांवर घट्ट झाकण ठेवावे.तसेच जेथे जेथे डास निर्माण होतात ती स्थाने नष्ट करावीत कंटेनर सर्वे करत असताना अनेकांच्या टाक्या उघड्या असतात,त्यावर झाकण नसते.आठवड्यातुन एक दिवस टाक्या कोरड्या करून नागरिक भरत नाहीत.कंटेनर सर्वे करत असताना नागरिक सांगतात ते वापरायचं पाणी आहे.त्यामुळे नागरिक त्या पाण्याकडे लक्ष देत नाहीत. पण मित्रांनो त्याच पाण्यामध्ये डासांची अंडी तयार होतात.ज्याप्रमाणे आपण पिण्याचे पाणी झाकून ठेवतो.त्याची काळजी घेतो.तशीच काळजी वापरायच्या पाण्याची सुद्धा प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे.डेंगू हा जीवघेणा आजार आहे. उपचारासाठी पैसेही खूप लागतात.म्हणून प्रत्येक नागरिकाने वरील गोष्टींचे पालन करून काळजी घेणे गरजेचे आहे. आम्ही फक्त समुपदेशन करू शकतो.लोकांमध्ये जनजागृती करू शकतो.परंतु आम्ही सांगितलेल्या गोष्टींचे पालन करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.डासांची निर्मिती रोखणे हे प्रत्येकाच्या हातात आहे.म्हणूनच नागरिकांच्या सक्रिय सहभागाशिवाय हिवताप,डेंगू व चिकनगुनिया सारखे आजार रोखता येणार नाही.तरी मी सर्व नागरिकांना कळकळीची विनंती करतो की आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे प्रत्येकाने पालन करावे.तरी आपण सर्व आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करून डेंगूंचे डास नष्ट करण्यासाठी प्रयत्न कराल अशी अपेक्षा बाळगतो.
आरोग्य विभाग आपले कर्तव्य पार पाडीत असतो. तसेच नागरिकांनी हे आपले कर्तव्य पार पाडावे ही विनंती.
चला तर मग आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करू या आणि हिवताप,डेंगू,चिकनगुनिया सारख्या आजारांना पळवु या
डॉ प्रमोद पोतदार
वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय मोर्शी
0 टिप्पण्या