Ticker

6/recent/ticker-posts

कुरंडीमाल येथील प्राथमिक आरोग्य पथक विविध समस्यांच्या विळख्यात??


👉 आरोग्य प्रशासनाने  पराकोटीने  लक्ष देण्याची गरज. 

👉 कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे  आरोग्य सेवा कोलमडली. ?? 


चित्रा न्युज प्रतिनिधी 
गडचिरोली : -  आरमोरी तालूक्यातील भाकरुंडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कुरंडीमाल येथील प्राथमिक आरोग्य पथकाला अनेकविध  समस्यांनी ग्रासले असुन  जिल्हा आरोग्य प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
जिल्हा परिषद  आरोग्य विभागातर्गत  आणि  तालुका आरोग्य अधिकारी आरमोरी  यांच्या अधिनस्त अधिनस्त असलेल्या   भाकरोंडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये समाविष्ट असलेल्या  कुरंडीमाल येथील प्राथमिक आरोग्य पथक परिसर कचऱ्याने बरबटलेले असुन   आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.   आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात आली नसल्याने कुरंडीमाल येथील प्राथमिक आरोग्य पथकातील फार्मासिस्ट ला   ओपीडी चिट्टीसह  प्रिक्शिप्शन लिहुन  औषध वितरण करावी लागते.  तर कधी कंत्राटी आरोग्य सेविकेला  सर्व कामे करून रुग्णांना सेवा द्यावी लागते..  आरोग्य सेविका  रजेवर असल्यास  डॉक्टरलाच सर्व  कामाचा डोलारा  सांभाळावा लागतो.  फार्मासिस्ट मात्र फक्त दोनच दिवस राखीव असतात. आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. ही गडचिरोली जिल्ह्यातील  आरोग्य  अधिकारी आणि  जिल्हा परिषद प्रशासनाची निष्क्रियता म्हणावी लागेल.
 गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात असलेल्या कुरंडीमाल प्राथमिक आरोग्य पथकात आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने   परिसरातील जनतेला  ऐनवेळी आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.  या प्राथमिक आरोग्य पथकात अत्यावश्यक सुविधा उपलब्ध आहेत  की नाही  याबाबत शंकाच निर्माण झाली आहे.. या पथकात कार्यरत असलेले आरोग्य कर्मचारी मुख्यालयी न राहता हे मुख्यतः आपल्या सोयीचे ठिकाणी राहतात. आणि ये...जा करित असतात. त्यामुळे  रात्री... बेरात्री  तब्बेत बिघडल्यास   अडचणी निर्माण होतात.
 प्राथमिक आरोग्य पथकात  अत्यावश्यक आरोग्य सुविधांचा अभाव असल्याने, 
गंभीर आजार असल्यास, रुग्णांना  आरोग्य केंद्रांमध्ये (उदा. उपजिल्हा रुग्णालय) संदर्भित केले जाते. 
प्रयोगशाळा सेवा  उपलब्ध नसल्याने वेळीच रक्ताच्या वेगवेगळ्या चाचण्या केल्या जाऊ शकत नाही. .जात नाही. 
प्राथमिक आरोग्य केंद्रात काही प्रमाणात तपासण्या उपलब्ध असतात. 
समुदाय स्तरावरील आरोग्य
समुदायातील लोकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र महत्त्वाची भूमिका बजावत असले तरी तज्ञ डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या अभाव आहे. 
समुदाय स्तरावर आरोग्य शिक्षण आणि प्रतिबंधात्मक उपायांमुळे लोकांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
आरोग्य समस्यांबद्दल शिक्षण आणि त्या टाळण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी , कुटुंब नियोजनासह माता आणि बाल आरोग्य सेवा  तज्ञ डॉक्टरां अभावी  मिळु शकत नाही..योग्य पोषण आहार याबाबत प्रचार आणि प्रसार केला जात नाही.  तज्ञ डॉक्टर नसल्याने  प्रमुख संसर्गजन्य रोगांविरुद्ध  उपचार केले जाऊ शकत नाही.   सुरक्षित पाण्याचा पुरेसा पुरवठा  आणि इतर अनेक सेवा उपलब्ध नसल्याने  परिसरातील नागरिकांना योग्य आणि चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा घेण्यासाठी   तसेच परिवहनासाठी वेळोवेळी  संसाधने  उपलब्ध नसल्याने  बऱ्याच प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतो. आम. रामदास मसराम  यांनी भाकरोंडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट दिल्यानंतर  ग्रामीण भागातील अनेक प्राथमिक आरोग्य पथक आणि सेवा  केंद्राची माहिती  उघड   होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या