Ticker

6/recent/ticker-posts

चड्डी ओली झाली, गुरूजी शाळेला पत्रा बसवा- चिमुकल्या विद्यार्थांची विनवणी

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी पाण्यात बसतात ,सोनवल टूकी येथील धक्कादायक प्रकार!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
शहादा : शाळेच्या वर्गात बसून पावसाच्या पाण्याने पूर्ण चड्डी ओली झाली आहे ,गुरूजी आता तरी शाळेच्या छताला पत्रा बसवा,अशी विनवणी शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनवल टूकी येथील चिमुकले विद्यार्थी गुरूजींकडे करत आहेत.जिल्हा परिषद शाळा सोनवल टूकी या शाळेत एकूण ५० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेला २ वर्गखोल्या आहेत व मुलांना शिकवायला २ शिक्षक आहेत. शाळेच्या इमारतीचे बांधकाम गेल्या काही वर्षापूर्वीच करण्यात आले आहे.परंतू  ५-६ वर्षातच या शाळेचा छताचा पत्रा जीर्ण झाला आहे.पावसाचे पाणी या जिरलेल्या पत्र्यातून चक्क वर्ग खोलीत पडू लागले आहे. पावसाच्या पाण्यात भिजत गळक्या वर्गखोलीत ही मुलं शिक्षण घेत आहेत.शाळेच्या छताचा पत्रा पूर्णपणे जिरला आहे,भिंतीला तळे पडले आहेत,भिंतीला शेवाळं लागलं आहे, शाळेचे नाव पुसलं गेलं आहे.अशी या जिल्हा परिषद शाळेची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.तरीही शाळा प्रशासन,ग्रामपंचायत प्रशासन वा  शिक्षण विभाग प्रशासनाकडून शाळेची दुरूस्ती केली जात नाही आहे.
                        या शाळेच्या दुर्लक्षामुळे शिक्षण विभागातील अधिकारी ,ग्रामपंचायतीत सरपंच व स्थानिक लोकप्रतिनिधी यांना झोप लागली आहे की काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वर्गातील ओल्या फर्शीवर पाण्यात भिजत विद्यार्थी शिकत आहेत.ओल्या कपड्यांत विद्यार्थ्यांचे चित्त लागत नाही आहे.अशा भौतिक सुविधांअभावी मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.जिल्हा परिषद व ग्रामपंचायत ला १४ वा १५ वा वित्त आयोग, पेसा निधी असा करोडो रूपये  निधी होतो.या शासकीय निधीतून ही शाळा दुरूस्त करता आली नसती का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.ओल्या वर्ग खोलीत आम्ही कशे शिकू,शाळेला लवकर पत्रा बसवा,अशी विनवणी विद्यार्थ्यानी  गुरुजींकडे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या