चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : येथील दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा भद्रावती मोहरम बहुउद्देशीय उत्सव समिती ( सर्वधर्म समभाव ) तर्फे विविध कार्यक्रम दिनांक -- 06 जुलै 2025 ला सायंकाळी 5 ते रात्रौ 10 वाजे पर्यंत गांधी चौक भद्रावती येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे गांधी चौक परिसर येथे संपूर्ण चौकात लायटिंग - विद्युत रोशनाई - पताका - स्वागत गेट - ढोल ताशे इत्यादिनी सजावट करण्यात येते यामध्ये अनेक जाती धर्माचे लोक दर्शनासाठी येत असतात
अनेक सामाजिक संघटने मार्फत शरबत - लंगर - मिठाई - प्रसाद - पिण्याच्या पाण्याचे वितरण होत असते या मध्ये व्यापारी असोशियन - आटो असोशियन - भद्रावती पत्रकार असोशियन व सामाजिक संघटनाचा सहभाग राहत असतो
भद्रावती तालुक्यातून - शहरातून व प्रत्येक वार्डा - वार्डातून सवऱ्या - ख्वाज्या - ताजे - पंजे - डोले गांधी चौकात एकत्र येऊन भेटी गाठी घेतात व याला जत्रेचे स्वरूप येत असते गेल्या 20 वर्षांपासून सदभावना - भाईचारा - कौमी एकता - देशभक्ती - शांतता कायम ठेवण्याचे कार्यक्रम समिती मार्फत होत असते
मोहरम ची 1 ली ला मोहरम ची सुरुवात होते व मोहरमच्या 4 थी ला व मोहरमच्या 5 वि ला सवाऱ्याची स्थापना होत असते व मोहरमच्या 7 वि ला व मोहरमच्या 9 वि ला रात्रौ सवाऱ्या व ख्वाज्या हे प्रत्येक दरग्यावर भेटी गाठी घेत असतात आणि मोहरमच्या 10 वि ला मोहरमची सांगता गांधी चौक येथे होतात
या कार्यक्रमाकरिता उपस्थित राहण्याचे आवाहन उमेश रामटेके माजी नगरसेवक व समितीचे अध्यक्ष -- राजू गैनवार माजी नगरसेवक व समितीचे सचिव -- अनिल धानोरकर माजी नगराध्यक्ष व समितीचे उपाध्यक्ष -- रब्बानी शेख संघटक -- निलेश पाटील माजी नगरसेवक व कार्याध्यक्ष -- प्रफुल चटकी माजी उपाध्यक्ष -- जावेद शेख -- सागर जट्टलवार -- प्रशांत बदखल -- जगन दानव -- ऍड सुनील नामोजवार माजी नगराध्यक्ष -- दिलीप ठेंगे - दिलीप मांढरे -- विनायक येसेकर -- खेमचंद हरीयानी -- विलास गुंडावार -- बाळू उपलंचीवार -- संजय बॅनर्जी -- प्रकाश पिंपळकर इत्यादीनी केले आहे.
0 टिप्पण्या