👉 महाराष्ट्र राज्य शासन झोपेतच राहाणार का❓
👉 सैनिक समाज पार्टीची शासनाकडे मागणी..
चित्रा न्युज प्रतिनिधी
गडचिरोली :- जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात अनेक वर्षे पासून सेवेत कार्यरत असलेल्या महिला परिचरांनी विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी बेमुदत संप पुकारला आहे. आणि आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे या महिला परिचर विविध मागण्यांसाठी शासनाशी संघर्ष करित आहेत. जानेवारी महिन्यात आझाद मैदानावर मोठ्या संख्येने एकत्रित येऊन आक्रोश आंदोलन केले होते. यावेळी शासनाने या मागण्या पूर्ण करण्याबाबत आश्वासन दिले होते; मात्र अद्याप याबाबत काहीच कार्यवाही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या महिला परिचरांनी पुन्हा शासनाविरोधात एल्गार पुकारला आहे. त्यांना किमान वेतन २१ हजार रुपये देण्यात यावे, अंशकालीन नावात बदल करावा, प्रसूती रजा मंजूर करावी, प्राथामिक आरोग्य केंद्रात एक पद ज्येष्ठतेनुसार परिचर पदावर देण्यात यावे, अशा मागण्या आहेत. याबाबत शासनाकडे अनेक निवेदन देण्यात आले.
आरोग्य विभागातील अंशकालीन महिला परिचर योजना, आरोग्य उपकेंद्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी आहे. या योजनेत, महिलां आरोग्य सेवांमध्ये मदतनीस म्हणून काम करीत आहेत. या महिलांना कमी मानधन मिळत असल्यामुळे त्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी होत आहे.
या योजनेत आरोग्य उपकेंद्रांमध्ये महिला परिचरांना (Attendants) काम करण्याची संधी मिळते.
या महिला आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक अंशकालीन (Part-time) स्वरूपात केली जाते.
अनेक ठिकाणी या महिला कर्मचाऱ्यांना कमी मानधन मिळत असल्यामुळे त्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी आहे. काही ठिकाणी किमान १०,००० रुपये मानधन मिळावे, अशी मागणी आहे.
कायमस्वरूपी करण्याची मागणी केली आहे.
सातव्या वेतन आयोगानुसार किमान वेतन मिळावे, अशी मागणी आहे, जे सध्याचे मानधन २१,००० रुपये आहे. या योजनेमुळे आरोग्य उपकेंद्रांमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढते आणि त्यामुळे आरोग्य सेवा अधिक सक्षम होऊ शकते
महिलांना आर्थिक सहाय्य मिळते आणि त्यांच्या कुटुंबाला आधार मिळतो.
ही योजना महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास मदत करते.
या योजनेमुळे दुर्गम ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य सेवा मिळण्यास मदत होते
अनेक ठिकाणी, या महिलांनी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलने आणि उपोषणे केली आहेत.
परंतु महाराष्ट्र राज्य शासनाने अजून पर्यंत कोणत्याही प्रकारचे निर्णय घेतले नाही. त्यामुळे शासनाचे धोरण किती निष्क्रिय आहे याची प्रचीती येते. आरोग्य विभागातील अंशकालीन महिला परिचर योजना, आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी एक महत्वाचा आधार आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांच्या मानधनात वाढ करणे आवश्यक आहे, तसेच त्यांना आरोग्य सेवेत कायमस्वरूपी संधी मिळवून देणे आवश्यक आहे. अशी मागणी सैनिक समाज पार्टीने शासनाकडे केली आहे.
0 टिप्पण्या