चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा -तालुक्यातील पहेला येथील पत्रकार व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस, व विविध वर्तमानपत्रात लेखणीच्या रूपाने कार्यरत व विविध सामाजिक संघटनेची निगडित असलेले पत्रकार संजीव भांबोरे यांची ब्लू स्टार्म टीव्ही न्यूज चॅनल
कमिटीच्या महाराष्ट्र स्टेट हेड पदावर ब्ल्यू स्टार्म न्यूज चैनल समितीचे संस्थापक प्रकाश बळीराम सोनवणे यांनी एका लेखी पत्रकाद्वारे नियुक्ती केलेली आहे. त्याचप्रमाणे ब्ल्यू स्टॉर्म टीव्ही न्यूज चॅनल चे विचार ,ध्येय ,धोरणे, शिस्त, सहकार्य व स्वावलंबन या प्रेरणेतून सर्वधर्म समभाव, समता व बंधुता यातून राष्ट्रीय ऐक्य निर्माण करण्यासाठी आपण कार्यरत व्हावे असे सुद्धा त्यांनी दिलेल्या पत्रातून सांगितलेले आहे. त्यांच्या नियुक्ती बद्दल महाराष्ट्रातील त्यांच्या चाहत्या पत्रकारांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे. ज्या पत्रकारांना ब्ल्यू स्टार्म न्युज चैनल मध्ये काम करायचे आहे जिल्हा प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी म्हणून काम करायचे आहे त्यांनी चॅनलचे संस्थापक प्रकाश सोनवणे मोबाईल क्रमांक 8484035810 व महाराष्ट्र स्टेटप्रमुख संजीव भांबोरे 7066370489 क्रमांकावर संपर्क साधावे असे आवाहन सुद्धा करण्यात आलेले आहे.
0 टिप्पण्या