Ticker

6/recent/ticker-posts

32 वर्षानंतर झालेल्या स्नेह मिलनात भेटीने सर्व वर्गमित्र गहिवरले


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : लोकमान्य विद्यालय तथा महाविद्यालय भद्रावती येथील वर्ग दहावी 1993 च्या वर्गमित्र यांचा 32 वर्षा नंतर स्नेह मिलन सोहळा दिनांक 17 ऑगस्ट 2025 ला मुरलीधर पाटील गुंडावार लॉन भद्रावती येथे दिवसभराचे सत्रात संपन्न झाला.

 या कार्यक्रमाला पुणे, मुंबई, हैदराबाद, नागपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व भद्रावती येथील 110 विद्यार्थी मित्र-मैत्रिणी तर 12 शिक्षक शिक्षिका उपस्थित होते, जुन्या आठवणींना उजाळा देण्याकरिता पंजाबी ढोल सह शाळे पर्यंत मिरवणूक फेरी काढून शिक्षकांसह शाळाभेट करण्यात आली, शाळेत प्रार्थना व त्यानंतर वर्गात बसून श्री पांढरे सर व श्री पामपट्टीवार सर यांनी मार्गदर्शन केले, सर्वांनी जुना काळ अनुभवला. त्या नंतर कार्यक्रम स्थळी म्हणजेच मुरलीधर पाटिल गुंडावार हॉल येथे परत येवुन शिक्षकांचा सत्कार कार्यक्रम व मार्गदर्शन झाले त्या मध्ये लोकमान्य विद्यालय भद्रावतीचे प्राचार्य मा.धरणे सर, पांढरे सर, जांभुळे सर, दरेकर सर, पामपट्टीवार सर, रावळे सर, मुनेश्वर सर, महाकुलकर सर, पाटील सर, ठेंगणे सर, पबितवार मॅडम, सोनटक्के मॅडम ह्यांचा सत्कार झाला , तसेच विद्यार्थी वर्गमित्र प्रकाश खडकेकर (सुपरिचित - सागर रांगोळीकार) यांनी रांगोळी स्वरूप सेवा दिली , त्यांचा ही सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे त्यावेळी शाळेच्या बाहेर गोळ्या बिस्कीट विकणारे नत्थू भाऊ होकम ह्यांची आठवण ठेवून त्यांना सुद्धा बोलावुन, सत्कार करण्यात आला, शाळे समोर असणारा गोळ्या बिस्कीटचा छोटासा दुकान ठेला साकारून त्यामधे त्यावेळचे सर्व खाद्य साहित्य ठेवण्यात आले, सर्वांनी आस्वाद घेतला. 
दरम्यान मैत्रीचा केक कापन्यात आला, व ग्रुप फोटो काढण्यात आला, जो त्याच दिवशी कार्यक्रमा दरम्यान फ्रेम सह तयार करुन सर्व मित्रांना वितरित करण्यात आला.
      त्यांनतर भोजन अवकाश घेऊन विद्यार्थ्यांच्या परीचय सत्रास सुरुवात झाली, कुणी नृत्य सादर केले तर काहींनी गित गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले , अनेक विद्यार्थी आज उच्च पदावर पदस्थ आहेत, त्या सर्वांनी एकमेकास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले, आणि भविष्यात कोणाच्या मुलांना काही मार्गदर्शन लागल्यास ते देऊन योग्य सहकार्य करण्याची भूमिका असल्याचे सर्वांनी बोलून दाखविले.  अत्यंत भावनिक प्रसंग घडून आला, कार्यक्रमाचे संचालन मोनाली कुलकर्णी (जानकी भांदककर), तर प्रास्ताविक रितेश उपलंचीवार यांनी केले. कालिदास कोलते यांनी कोष सांभाळला, कार्यक्रमाचे यशस्वीते करिता रितेश उपलंचीवार, नरेश लांडगे, कालिदास कोलते, विनोद ठमके, अब्दुल मतीन, राजेश गुंडावार, नितीन मशीदकर, संजय राय, नंदू नक्षिने, मनोज खरवडे, मनीष गोलेच्छा, महादेव टोंगे, प्रताप हांडे, भुजंग पोटे, समीर देशमुख, प्रवीण झाडे, उदय गुंडावार, अर्चना झाडे, संगीता सातपुते, रंजना लांडगे, यांनी अथक परिश्रम घेतले तर आभार प्रदर्शन रितेश उपलंचीवार यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या