Ticker

6/recent/ticker-posts

बोगस शालार्थ आयडी प्रकरणात शिक्षण विभाग नंदूरबार मधील अधिका-यांची चौकशी करा- बिरसा फायटर्सची मागणी

कर नाही तर डर कशाला?- सुशिलकुमार पावरा

चित्रा न्युज प्रतिनिधी 
नंदूरबार :-   शालार्थ आयडी प्रकरणात घोटाळा करणा-या  नंदुरबार जिल्हा परिषद मधील शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचा-यांची सखोल चौकशी करून  दोषी आढळल्यास फौजदारी गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,शिक्षण मंत्री,जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी,पोलीस अधीक्षक नंदूरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
                       बोगस शालार्थ आयडी प्रकरणात नागपूर येथील प्रथमदर्शनी दोषी असणा-या शिक्षणाधिकारी व कर्मचाऱ्यांना अटक झाल्यानंतर नंदुरबार जिल्हा परिषद येथील शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचा-यांनी ८ ऑगस्ट २०२५ पासून सामूहिक रजा आंदोलन करणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार यांना दिले  आहे. निवेदनावरून "कर नाही तर डर कशाला?" अशी शंका निर्माण होते. बोगस शालार्थ आयडी घोटाळा हे भ्रष्टाचाराचे प्रकरण आहे.बोगस शालार्थ घोटाळा प्रकरणात ज्यांनी खरोखर घोटाळा केला आहे,गुन्हा केला आहे,त्यांच्यावरच कारवाई होणार आहे.असे असतांना शिक्षण विभागातील अधिका-यांचे सामूहिक रजा आंदोलन हे असंवैधानिक असून भ्रष्टाचाराचे समर्थन करणारे वाटते.
                        जिल्हा परिषद नंदूरबार मधील शिक्षण विभागातील तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. सतीश चौधरी यांना  भ्रष्टाचार प्रकरणात ॲन्टी करप्शन ब्युरो नंदुरबार ने अटक केली आहे व सेवेतून निलंबित केले आहे.शिक्षण विभागातील श्री.सुभाष मारणार प्रशासन अधिकारी यांनी जिल्हा  बदली पात्र शिक्षकाकडून ९७ हजार रूपये घेतल्याचे विडीओ सोशल मिडीयावर वायरल झाले आहेत.शिक्षण विभागातील अधिका-यांनी पदोन्नतीत मोठा घोटाळा केल्या प्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून सेवेतून बडतर्फ करा,असे तक्रार अर्ज करण्यात आले आहे.शिक्षण विभागातील अनेक अधिकारी व कर्मचारी हे भ्रष्टाचार प्रकरणांत अडकल्याच्या घटना घडल्या आहेत.म्हणून बोगस शालार्थ आयडी भ्रष्टाचार प्रकरणात नंदुरबार जिल्हा परिषद मधील शिक्षण विभागातील काही अधिकारी व कर्मचारी हे चौकशी होण्या आधीच आमची चौकशी करू नका,अशी चूकीची मागणी करत आहेत.शिक्षण विभागातील "शालार्थ आयडी घोटाळा" हा केवळ आर्थिक अपहार नव्हे, शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारण्यात आला आहे.नंदूरबार जिल्ह्य़ातील शिक्षण विभागातील संबंधित  शिक्षण अधिकारी व कर्मचारी यांची एसआयटी मार्फत सखोल चौकशी झाली नाहीतर बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या