चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा-"आपल्या स्थानिक निवासी युवकांनी अगोदर गुलामगिरीतून मुक्त व्हा, असे प्रतिपादन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे नवनियुक्त शहराध्यक्ष रवि भोंगाणे यांनी साकोली येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत व्यक्त केले.त्यांची साकोली शहर नवनियुक्त अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार सुद्धा करण्यात आला .त्याचप्रमाणे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे भंडारा जिल्हाध्यक्ष आशिश चेडगे यांच्या वतीने त्यांना लेखी नियुक्तीपत्र सुद्धा देण्यात आले.. ते पुढे म्हणाले की,आपल्या स्वातंत्र्याचे काय हक्क आहेत ते अगोदर जाणून घ्या. दृढ विश्वास व अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी याच इच्छाशक्तीच्या बळावर आज साकोलीत "साकोली सेंदूरवाफा स्थानिक निवासी युवा संघटना" यामध्ये दोनशेच्या वर युवक सामिल झाले. कारण त्यांना माहित होते की, एक ना एक दिवस कुणीतरी संघटना घेऊन येईल व आमच्या मुळ हक्कासाठी लढा देणारे व्यासपीठ उपलब्ध होणार. व ते आज शक्य झाले आहे" असे प्रतिपादन महाराष्ट्र शासन मान्य प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ साकोली शहराचे नवनियुक्त अध्यक्ष तथा कडक निर्भिड लेखणीचे बाहशहा रवि भोंगाणे यांनी केले.
महाराष्ट्र शासन मान्य प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी काल १६ ऑगस्टला त्यांच्या नावाची घोषणा केली. तसे जिल्हा अध्यक्ष आशिष चेडगे यांनी तातडीने नियोजन करून त्यांना शासनमान्य पत्रकार संघाच्या लेटरपॅड वर नियुक्ती पत्र देत त्यांचे पत्रकार संघावतीने स्वागत व अभिनंदन करण्यात आले. या नियुक्ती व स्वागत सोहळा प्रसंगी शासनमान्य महाराष्ट्र पत्रकार संघ जिल्हा उपाध्यक्ष डी. जी. रंगारी, साकोली सेंदूरवाफा स्थानिक निवासी युवा संघटना अध्यक्ष प्रमोद मेश्राम, पत्रकार संघाचे ता. अध्यक्ष निलय झोडे, ग्रामिण अध्यक्ष दूर्गेश राऊत, विरेंद्र मेश्राम, शहर सचिव किशोर बावणे, यशवंत कापगते, स्थानिक निवासी संघटना उपाध्यक्ष अनिल कापगते, दिपक जनबंधू, छायाचित्रकार विशाल केरझरे यांसह साकोली सेंदूरवाफा स्थानिक निवासी युवा संघटनेचे कोषाध्यक्ष गणेश बोरकर, सदस्यगण महेश पोगळे, मनिष राऊत, अमोल हत्तीमारे, झनकलाल लांजेवार, युगांतर बारसागडे आदी सत्कार प्रसंगी हजर होते. या सोहळ्याला संचालन किशोर रंगारी तर आभार दुर्गेश राऊत यांनी मानले.
0 टिप्पण्या