नगरपरिषदेला अनेक वेळा निवेदने देण्यात आली मात्र बधिर प्रशासनाला घाम फुटेना -- सामाजिक कार्यकर्ते लिमेश माणुसमारे
चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : स्वच्छ भद्रावती सुंदर भद्रावती अशी बिरुदावली मिरविणाऱ्या नगर परिषद भद्रावतीच्या भोंगळ व निष्क्रीय प्रशासनाला कंटाळून गवराळा गणपती वार्डातील प्रलंबित समस्या मार्गी लागावी याकरिता चक्क जिल्हाधिकारी यांना तक्रार देऊन समस्या प्रती अवगत केले.
स्थानिक सामाजिक कार्यकर्ते लिमेश माणूसमारे व वॉर्ड वासियानी गवराळा स्मशानभूमी, अहिल्यादेवी होळकर चौक ते टी पॉईंट मुख्य म्हणजे स्वराज नगर येथील अतिशय दयनीय व जीवघेणा रस्ता , गणेश मंदिर ते रेल्वे गेट कडे जाणारा रस्ता दुरुस्तीची मागणी अनेक दिवसापासून केली होती. याबाबत अनेकदा विनंती निवेदन देण्यात आली मात्र बधीर प्रशासनाला घाम फुटला नाही, याबाबत अभियंते व बांधकाम कर्मचारी, मटेरियल पुरवठा ठेकेदार यांना फोन करून विचारणा केल्यास थातूरमातूर उत्तरे देतात . मुख्याधिकारी व अभियंते यांचे ढीम्म प्रशासकीय यंत्रणेचा निषेध करीत याबाबत आज दिनांक १९ ऑगस्ट ला चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल करून कारवाहीची मागणी करण्यात आली.
समस्या मार्गी न लागल्यास यापुढे मुख्याधीकाऱ्याच्या दालनापुढे ठिय्या आंदोलन करण्यात येईल असे निवेदनकर्त्यांनी सांगितल
0 टिप्पण्या