चित्रा न्युज प्रतिनिधी
वर्धा :- धम्म प्रचारक सुरेश भिवगडे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात निभावली महत्त्वपूर्ण भूमिका.
बिहार मधील बुद्धगया येथील तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विहार व्यवस्थापनाचा ताबा ब्राह्मण धर्म पंडितां ऐवजी बौद्ध अनुयायांना द्यावा या मागणीसाठी संपूर्ण देशामध्ये आंदोलने चालू आहेत. त्याच अनुषंगाने दौंड मध्येही बौद्ध अनुयायांनी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बुद्धिस्ट समन्वय संघ महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे भंते विनाचार्य यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली धम्म ध्वज यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही धम्म ध्वज यात्रा दिनांक 17 ऑगस्ट 2025 ला आर्वी शहरात दाखल झाली.
याप्रसंगी आर्वी शहरातील उपासक उपासकांच्या वतीने धम्म ध्वज रॅलीचे भव्य स्वागत करण्यात आले. या धम्म ध्वज रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करून सर्व भारतीय बौद्धांच्या वतीने एकच मागणी करण्यात येत आहे की
महाबोधी महाविहाराचे ब्राह्मणीकरण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात येत असल्याने बुद्धगया मंदिर कायदा 1949 मध्ये निरस्त करून महाबोधी महाविहार बौद्धांचे देखरेखी खाली व्यवस्थापनासाठी देण्यात यावे,
स्थानिक रोशन सेलिब्रेशन हॉल आर्वी येथे भंते विनाचार्य यांचा जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भंते विनाचार्य प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी राकेश धारगावे, म्हणजेच सिंग नौटियाल भीम आर्मी, योगेश राऊत, जयप्रकाश, बसपा नॅशनल कोर,
शिवम खेवडीया, भंते अभय बोधी, भंते विनयकीर्ती इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती. धम्मासारथी डॉ. रा. भ. उपाख्य अण्णासाहेब शेंडे यांच्या जीवनावर लिहिलेल्या कविता, काव्य आणि गीत संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले भंते विनाचार्य यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
यावेळी या धम्म सभेला ग्रामीण भागातील व आर्वी शहरातील
मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक
धम्म प्रचारक सुरेश भिवगडे
यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका विशद केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुरेश भिवगडे यांनी मानले.
या कार्यक्रमाचे आयोजनासाठी
सर्व दानदात्यांनी व उपासक-उपासिकांनी फार मोलाची भूमिका बजावली.
0 टिप्पण्या