Ticker

6/recent/ticker-posts

डोलारा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने जलमय होऊन नारिकाच्या घरात पाणी शिरले


नगरपरिषद प्रशासनाला माहित असतांना सुद्धा सुस्त प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा नागरिकांचा आरोप


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : शहरातील डोलारा तलाव  ओव्हरफ्लो झाल्याने डोलारा प्रभागातील तलावाच्या आजु बाजुचा परिसर जलमय झाल्याने. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे घरितील सामान, अनाज,कागदपत्रे खराब झाल्याने येथील नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

या परिस्थितीची माहिती शिवसेनेचे लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी करुन त्यांनी स्वखर्चाने डिझेल उपलब्ध करून दिल्याने मोटर पंपाद्वारे तलावाती पाणी काढण्यात आल्याने स्थानिकांना थोडा दिलासा मिळाला.

दरवर्षी हा तलाव ओव्हरफ्लो होत असल्याची माहिती नगरपरिषद भद्रावती प्रशासनाला माहित असताना सुद्धा सुस्त प्रशासनाने दुर्लक्ष केले. या परिसरातील नागरीकांनी  वारंवार निवेदन करुनही आवश्यक पाऊले उचलली गेली नाही.
 
प्रशासन या घटनेचे काहीच सोयर- सुतक नसल्यासारखं  उलट त्यांना तुम्हाला येथे घरे बांधायला आम्ही सांगितले काय? असे उलट उत्तरे मिळते. मग या पिडित जनतेने जायचे कुणाकडे असाही प्रश्न नागरिकांना पडला आहे. 

नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनावर नाराजी व्यक्त करताना  मुकेश जिवतोडे यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी जिवतोडे यांनी तहसीलदाराना नुक्सानग़्रस्ताना त्वरित मदत देण्याची मागणी केली. तसेच हलगर्जीपणा केलेल्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाही करण्यात येणार असल्याचे दम दिला.

यावेळी नगरपरिषदचे माजी उपनगराध्यक्ष प्रफुल्ल चटकी, नशिवसेना शहर प्रमुख पप्पू सारवान, माजी नगरसेवक चंदु खारकर, प्रतिभा सोनटक्के, प्रमोद गेडाम, युवासेना माजी उपजिल्हा प्रमुख महेश जिवतोडे, यांच्यासह  मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.

-------------------------------------------

        डोलारा तलाव संदर्भात नागरिकांच्या प्रतिक्रिया

------------------------------------
पुर्वीच जर उपाययोजना केली असती तर आज ही परिस्थिती नसती

*डोलारा तलाव हा एक ऐतिहासिक तलाव आहे. जेव्हा हा तलाव भरुन राहायचा  त्यावेळी झाडे प्लाट,पंचशील नगर, चिचोर्डी  त्याचा आसपासची बोरच्या पाण्याची पातळी ही आजच्या पेक्षा जास्त असायची  परंतु आज परिस्थिती वेगळी आहे नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षे मुळे येथे तलावाच्या खोलीत सुध्दा घर झाली  त्यामुळे पाण्याची पातळी वाढली की घरे बुडतात याकडे पुर्वीच जर उपायोजना केली असती. तर आज ही परिस्थिती उदभवली नसती.*

   *एक सुजाण नागरिक*
----------------------------------------

*तलावाचे खोलीकरण करणे हाच एकमेव उपाय*

यापुर्वी मुख्यधिकारी मॅडम यांना सांगितलं होत, आणि निवेदन सुद्धा दिले होते BRSP पक्षाकडून, पहिले पाणी तलावातील रोड वर आणि लोकांचा घरात पाणी शिरत नव्हते, पाणी घरात शिरण्याचे कारण म्हणजे तालुका क्रीडा संकुल मधील जे पाणी पहिले तलावात येत नव्हते, तिथे पूर्वी विटा भट्टी असल्यामुळे तिथे गड्डे होते आणि ते पाणी तिथेच साचत होते. सात वर्षांपूर्वी क्रीडा संकुल लेवल करण्यात आले, व पूर्वी जे गड्डे होते, ते बुजवण्यात आले, त्यामुळे लोकांचा घरात पाणी शिरत आहे, त्या वर एकच उपाय म्हणजे तलाव आत्ता लेव्हल आलं आहे, तर त्याला खोलीकरण  करावे लागणार आहे, हाच एकमेव उपाय आहे.


 विकास दुर्योधन (बि. आर. एस. पी)
-----------------------------------------
तलावातील पुल पुरातत्व खात्यात येत असल्याने खोलीकरण किंवा सौंदर्यीकरण करता येत नाही.

सदर डोलारा तलाव हा शासन म्हणजे महसूल खात्या अंतर्गत येतो.
तसेच तलावतील पूल हा पुरातत्व खात्या अंतर्गत येत असल्याने त्या तलावात कसलेही खोलीकरण किंवा सौंदरीकरण करता येत नाही.
   पुरातत्व खात्याची परवानगी घेऊनच हे काम करता येईल.
     तलावात  पोटात राहणाऱ्या सर्व नागरिकांना जून महिन्यापासून सूचना देण्यात येत आहे. नोटीस देखील देण्यात आलेल्या आहे.

नगरपरिषद प्रशासन भद्रावती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या