चित्रा न्युज प्रतिनिधी
नंदुरबार :- ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्य दिनी जालन्यात गोपाल चौधरी या आंदोलन कर्त्याला फिल्मी स्टाईल ने लाथ मारणा-या अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना तात्काळ सेवेतून काढून टाका,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार यांना देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,प्राध्यापक सा-या पाडवी,मंगल वसावे,दिनेश वसावे,सायसिंग वसावे,रमेश वसावे,निमजी वसावे,दिल्या वसावे,शिमल्या वसावे,खुमानसिंग वसावे, केल्ला वसावे,ईश्वर वसावे,बाज्या वसावे,सत्या वसावे,प्रविण वसावे,पाश्या वसावे, गणेश वसावे,कालूसिंग वसावे,दित्या वसावे,सिंगा वसावे,भिका वसावे,सोन्या वसावे,रणजित वसावे,जयश्री वसावे,गुलाबसिंग वसावे इत्यादी ४० पेक्षा अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.
१५ ऑगस्ट २०२५ रोजी जालन्यात गोपाल चौधरी या आंदोलन कर्त्याला उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी फिल्मी स्टाईल ने लाथ मारल्याची घटना घडली आहे.या घटनेचा आम्ही बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो. अशा प्रकारची कृती एका उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर असणा-या पोलिसाला शोभत नाही,सदर कृती अत्यंत निंदनीय आहे.या घटनेमुळे सामान्य जनतेत या पोलिसाविरोधात प्रचंड संताप निर्माण झाला आहे.पोलिसांबद्दल अनादर निर्माण होत आहे.सगळीकडे संतप्त प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
आंदोलन कर्त्याच्या मुलीसमोर अनंत कुलकर्णी यांनी सार्वजनिक ठिकाणी आंदोलन कर्त्याला लाथ मारली आहे.एका लहान चिमुकलीसमोर एका बापाला कोणी पोलीस अधिकारी अशा पद्धतीने लाथ मारत असेल तर ते बालमनावर मोठा आघात करणारी कृती आहे.सर्व सामान्य जनतेच्या या घटनेमुळे भावना दुखावल्या आहेत. एका आंदोलन कर्त्यासोबत पोलीस असे वागत असतील तर सर्वसामान्य जनतेसमोर कशे वागत असतील? असा प्रश्न निर्माण होतो.पोलिसांकडून सर्वसामान्य लोकांवर अशा प्रकारच्या अमानुष अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यामुळे पोलिस हे जनतेचे रक्षक की भक्षक असा प्रश्न निर्माण होतो.
डिवायएसपी अनंत कुलकर्णी यांची ही आंदोलन कर्त्याला लाथ मारण्याची कृती अत्यंत निंदनीय आहे.या घटनेमुळे अनंत कुलकर्णी यांनी पोलिस खात्याला कलंकित केले आहे.पोलिसांबद्धल जनतेत तीव्र संताप निर्माण केला आहे.खाकी वर्दीला काळीमा फासला आहे.म्हणून जालन्यात स्वातंत्र्य दिनी एका आंदोलन कर्त्याला फिल्मी स्टाईल ने लाथ मारणा-या उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांना तात्काळ सेवेतून काढून टाकण्यात यावे.अशा पोलिसांची पोलीस खात्यात आवश्यकता नाही.
0 टिप्पण्या